पुणे महानगरपालिकेत नोकरी अन् काम काय करायचा पाहा...

पुणे महानगरपालिकेत आरोग्य विभागामध्ये नोकरी करीत असून, त्याचेवर झालेले कर्ज फेडण्यासाठी तो बिबवेवाडी मार्केटयार्ड परीसरातून मोबाईल चोरी करीत असल्याचे त्याने सांगीतले.

पुणेः कर्ज फेडण्यासाठी मोबाईल चोरी करणाऱयाला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या ताब्यातून 21 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल ताब्यात घेतले आहेत. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! नर्सचा ड्रेस घालून रुग्णालयात आली अन्...

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात मोबाईल चोऱ्या होतात. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल झावरे व पोनि गुन्हे अनिता हिवरकर यांचे सुचनेप्रमाणे तपास पथक प्रभारी राजेश उसगांवकर हे स्टाफसह बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. पोलिस अंमलदार सतिश मोरे यांना मिळालेल्या बातमी वरुन एक व्यक्ती महावीर गार्डनच्या जवळ मुख्य रस्त्यावर गंगाधाम रोड पुणे याठिकाणी चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आला असून, तो रस्त्याने येणारे जाणाऱयांना थांबवून मोबाईल घेण्याबाबत विचारणा करीत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. 

धक्कादायक! पुणे स्टेशन परिसरातून मुलीचे अपहरण करून बलात्कार

मिळालेल्या बातमीचे ठिकाणी सोबतचे स्टाफसह जावून खात्री केली असता एक व्यक्ती रस्त्याने येणारे जाणारे लोकांना मोबाईल घेण्याबाबत विचारणा करताना दिसला. मिळालेल्या बातमीची खात्री झाल्यानंतर सदर व्यक्तीस अमंलदार यांनी त्याचेकडील एकूण ०६ वेगवेगळया कंपनीचे मोबाईलसह ताब्यात घेतले. त्यास नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव पत्ता तानाजी शहाजी रणदिवे (वय ३३, रा. शांतीनगर साईबाबा मंदिराजवळ, रामटेकडी हडपसर पुणे) असे सांगितले. त्याचेकडे मिळून आलेल्या मोबाईलबाबत त्यांनी चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. सहा मोबाईलसह बिबवेवाडी पोलिस स्टेशन येथे आणून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता तो पुणे महानगरपालिकेत आरोग्य विभागामध्ये नोकरी करीत असून, त्याचेवर झालेले कर्ज फेडण्यासाठी तो बिबवेवाडी मार्केटयार्ड परीसरातून मोबाईल चोरी करीत असल्याचे त्याने सांगीतले. त्याने एकंदरीत ५० हुन अधिक मोबाईल हँडसेट चोरल्याचे सांगून ते रस्त्यावरील अनोळखी फिरत्या व्यक्तींना विकल्याचे सांगीतले.

धक्कादायक! पुण्यातील सामूहिक बलात्काराबाबत नवी माहिती समोर...

सदर मोबाईल हँडसेट पैकी एकूण २१ मोबाईल हँडसेट व गुन्हा करते वेळी वापरलेली होंडा कंपनीची मोपेड अॅक्टीवा गाडी सह एकूण १,८८,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

गणेशोत्सव! राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर...

सदरची कारवाई ही अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, परिमंडळ ०५ चे पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, वानवडी विभागाचे सहा. पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल झावरे व पोलिस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि राजेश उसगांवकर, सपोफौ मते, पोलिस अंमलदार, सतिश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी व राहुल शेलार यांनी केली आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune crime news pmc employee arrested for mobile robbery and
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे