Video: 'तू तुझ्या बायकोला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे...'
तू पांढऱ्या पायाची असून तू जोपर्यंत मला घटस्फोट देणार नाहीस, तोपर्यंत मी आमदार किंवा मंत्री होणार नाही.पुणे: 'तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे. तिचं ग्रहमान दूषित झाले आहे. त्यामुळे तुझी ही बायको तुझ्यासोबत कायम राहिली तर तू आमदार किंवा मंत्रीही होणार नाही. त्यामुळे राजकीय यश मिळवायचे असेल तर तू तुझ्या बायकोला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे,’ असे सांगून एका प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छळ करायला लावल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी एका अध्यात्मिक गुरूला अटक केली आहे.
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
संबंधित अध्यामिक गुरुच्या सांगण्यावरून सुशिक्षित कुटुंबाने अघोरी कृत्य करत सुनेचा छळ केला होता. याप्रकरणी पीडित सुनेने चतुःश्रृंगी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. रघुनाथ राजाराम येमूल (वय 48) असे अटक केलेल्या अध्यात्मिक गुरूचे नाव आहे. तो बाणेर परिसरातील धवलगिरी अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे. आरोपी रघुनाथ येमूल याचे पुणे शहरात आणि जिल्ह्यात शेकडो भक्त आहेत. पण एका सुशिक्षित कुटुंबाला सुनेचा छळ करण्याचा आणि घटस्फोट घेण्याचा सल्ला दिल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी महाराज येमूल याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
थरारक! तडीपार गुंडाचा पाठलाग करून ठेचून खून...
याबाबतची अधिक माहिती अशी की, 'काही दिवसांपूर्वी पीडित महिलेनं अघोरी कृत्य आणि कौटुंबीक छळाप्रकारणी गणेश ऊर्फ केदार गायकवाड, नानासाहेब गायकवाड, नंदा गायकवाड, सोनाली गवारे, दीपक गवारे, भागिरथी पाटील, राजू अंकुश अशा 7 जणांवर गुन्हा दाखल केला होता. चतुःश्रृंगी पोलिस या गुन्ह्याचा तपास करत असताना, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. अध्यात्मिक गुरुच्या सांगण्यावरून महिलेचा छळ केल्याची माहिती पोलिस तपासात उघड होताच पोलिसांनी अध्यात्मिक गुरू रघुनाथ येमूल याला बेड्या ठोकल्या आहेत.
खुलासा! ...म्हणून त्याने बैलाला क्रूरपणे मारले
बापरे! पोलिसांना टेंम्पोच्या आत पाहिल्यावर बसला धक्का...
फिर्यादीने तक्रारीत म्हटल्यानुसार, 'डिसेंबर 2019 मध्ये एकेरात्री फिर्यादी आपल्या बाळासह बेडरूममध्ये झोपल्या होत्या. दरम्यान त्यांना कुजबुजण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिलं असता याठिकाणी आरोपी सोनाली आणि दीपक गवारे हे बेडरूमच्या बाहेर हळदी-कुंकू लावलेल्या टाचण्या मारलेला लिंबू एका पिशवीत ठेवताना दिसले. यानंतर पीडितेन हा प्रकार आपले पती गणेश यांना सांगितला. यावेळी पती गणेश याने 'तू पांढऱ्या पायाची असून तू जोपर्यंत मला घटस्फोट देणार नाहीस, तोपर्यंत मी आमदार किंवा मंत्री होणार नाही. अध्यात्मिक गुरू रघुनाथ यमूल यांनी दिलेला लिंबू तुझ्यावरून उतरवून टाकला तर तुझी पीडा कायमची निघून जाईल, असे सांगितले. यानंतर पीडितेने चतुःश्रृंगी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.