बापरे! अधिकाऱयाने बदलीसाठी सावकारांकडून घेतले लाखो रुपयांचे कर्ज...

सहकार विभागातील लेखाधिकाऱ्याने बदलीसाठी सावकारांकडून घेतले लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते.

पुणे: सहकार विभागातील लेखाधिकाऱ्याने बदलीसाठी सावकारांकडून घेतले लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. पण, सावकारांच्या जाचाला कंटाळून लेखाधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. गणेश शंकर शिंदे (वय 52) असे मृताचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

गणेश शंकर शिंदे यांना पुण्याला बदली हवी होती. या बदलीसाठी त्यांच्याकडे अधिकाऱ्यांनी पैसे मागितले होते. ते पैसे देण्यासाठी सावकारांकडून त्यांनी तब्बल 30 टक्के व्याजदराने 84 लाख 50 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यानंतर पैशांसाठी सावरकरांनी तगादा लावला होता. शिवाय, अधिकाऱ्याच्या झालेल्या फसवणूकीमुळे सहकार विभागात लेखाधिकारी कार्यरत असलेल्या गणेश शिंदे यांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स इमारतीमध्ये सोमवारी घडली आहे. याप्रकरणी शंकर लक्ष्मण गायकवाड, विजय सोनी आणि त्यांचे वडील, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीष हाजरा, पंधरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील विजय सोनी, क्षीरसागर, साळुंखे आणि हाजरा यांना पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश शिंदे हे सहकार विभागाच्या मुंबई कार्यालयात लेखाधिकारी होते. त्यांना यांनी मुंबईहून पुण्याला बदली हवी होती. बदलीकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी शिंदे यानी आरोपी सावकारांकडून तब्बल 84 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी 20 ते 30 टक्के व्याजदर आकारण्यात आला होता. या पैशासाठी आरोपींनी लेखाधिकारी गणेश शिंदे यांचा मानसिक व आर्थिक छळ सुरू केला होता. दरम्यान, पंधरकर नावाच्या व्यक्तीने शिंदेंना 1 कोटी रुपयांचे पीएल लॉन करून देण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी शिंदे यांच्याकडून मोठी आर्थिक रक्कमही उकळण्यात आली. मात्र, ऐनवेळी लोन करून देण्यास नकार दिल्याने शिंदे यांना धक्का बसला होता. 

एककीडे आरोपी सावकरांच्या जाच आणि दुसरीकडे झालेली फसवणूक याप्रकाराला कंटाळून शिंदे यांनी राहत्या घरात गळफास घेत आपले जीवन संपवले. दरम्यान, घटनास्थळावरुन पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

आपण यांना ओळखता का? पोलिसांशी संपर्क साधा...

धक्कादायक! पुणे शहरात झोमॅटो बॉयने घेतला युवतीचा जबरदस्तीने किस...

पुण्याजवळ शिवशाही बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर...

पुण्यात 'सेक्स तंत्र' कोर्सची जाहिरात व्हायरल; पोलिसांकडून शोध सुरू...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ९५वी कारवाई...

पुणे जिल्ह्यात नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह; पाहा वर्णन...

सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...

भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची रवानगी येरवड्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune crime news officers demand bribe to transfer for pune a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे