आचारी म्हणाला; तुम्हाला माझ्या बाबत मिळालेली माहिती चुकीची...

खानावळीच्या (मेसच्या) आडून घरफोड्या करणा-या आचा-यास केले जेरबंद

मी स्वतः आचारी असून लोकांना डबे पुरवण्याचे काम देखील करतो. तुम्हाला माझे बाबत मिळालेली माहिती चुकिची आहे.

पुणे: खानावळीच्या (मेसच्या) आडून घरफोड्या करणाऱ्या आचाऱ्यास गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून एकून 15 गुन्हे उघडकीस आले आहे. या गुन्हयातील सहा लाख 64 हजाराचा ऐवजही हस्तगत केला आहे. आकाश अशोक उमाप (रा.वानवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

SVS Aqua: पत्नीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण...

पुणे शहर पोलिस आयुक्तालया अंतर्गत नव्याने समाविष्ट झालेल्या लोणीकंद व लोणीकाळभोर पोलिस स्टेशनचा भौगोलीक परीसर पाहाता या दोन पोलिस स्टेशन हद्दीसाठी स्वतंत्रपणे नव्याने स्थापन झालेल्या गुन्हे शाखा युनिट ६ कडून मे महिनाच्या कालावधीत आरोपींना अटक करून त्यांचेकडून एकुण २० गुन्हे उघडकीस आणले आहेत. युनिट ६ चे अधिकारी व कर्मचारी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वाहनचोरी, घरफोडी चे अनुषंगाने अधिक तपास करत असताना हडपसर पोलिस स्टेशन गु.र.नं ४१२/२०२१ भा.द.वि.क ३९२ हा गुन्हा एका आचा-याने केला असल्याची खात्रीशीर माहिती पो.ना. नितीन मुंढे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली. सदरची माहिती श्री गणेश माने पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ६ यांना कळवून त्यांचे सुचनांप्रमाणे पोलिस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे यांनी विकासनगर वानवडी भागात सापळा रचून शिताफीने संशयीत आकाश अशोक उमाप (रा. वानवडी पुणे) यास ताब्यात घेतले.

SVS Aqua कंपनीत मृत्यू झालेल्या 17 जणांची नावे आली समोर...

त्यास सदर गुन्ह्यामध्ये दि. ०५/०६/२०२१ रोजी अटक करून मा. न्यायालयाने त्यास दि.०८/०६/२०२१ रोजी पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड दिली आहे. त्याचेकडे चौकशी करता "मी स्वतः आचारी असून लोकांना डबे पुरवण्याचे काम देखील करतो. तुम्हाला माझे बाबत मिळालेली माहिती चुकिची आहे." असा आव आणून खोटे बोलण्याचा प्रयत्न करू लागला पण पोलिसांनी कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले व हडपसर मधील साथिदारांसह यापुर्वी पुणे शहरामधे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

प्युरीफायरचे केमिकल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग

आकाश उमाप हा वानवडी परिसरात एका मेसच्या ठिकाणी जेवण बनवण्याचे व डबे पोहोचवण्याचे काम करत आहे. कामाच्या आडून पुण्यातील विविध परीसरात बंद घरांची रेकी करत आपल्या साथिदारांसोबत घरफोडी चोरी, वाहन चोरी, जबरी चोरी असा नित्यक्रम त्याने चालू ठेवला. आचारी पणाचा आव घेऊन परत मेस मध्ये काम करून आपण काहीच करत नाही या अविर्भावात वावरत असे. त्याची सखोल चौकशी करत असताना त्याने सदरचे गुन्हे हे त्याने रेकॉर्ड वरील आरोपी नामे जयसिंग कालुसिंग जुन्नी ऊर्फ पिलु, सोमनाथ ऊर्फ सोम्या गारुळे दोघे राहणार बिराजदार नगर हडपसर यांचे सोबत केल्याचे सांगितले आहे.

बहिणीला खिडकीतून आतमध्ये पाहिल्यावर बसला धक्का...

आकाश उमाप याचेकडे चौकशी करता त्याने पुणे शहरामधे १३ घरफोडी, १ वाहनचोरी, १ जबरी चोरी असे एकूण १५ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचे ताब्यातून चोरी केलेले ७७ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदीचे वस्तु व दागिणे, दोन दुचाकी, दोन टिव्ही व रु ४६,००० रोख असा एकूण रु. ६,७०,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कालव्याच्या कडेला कपडे आणि चप्पला दिसल्यावर बसला धक्का...

सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त, अशोक मोराळे, गुन्हे शाखा पुणे, मा. पोलिस उप आयुक्त, श्रीनिवास घाडगे, गुन्हे शाखा पुणे शहर, सहा पोलिस आयुक्त, लक्ष्मण बोराटे, गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश माने, गुन्हे शाखा युनिट ६ यांना कळवून त्यांचे सुचनांप्रमाणे सहा पो. निरी. नरेंद्र पाटील, पोलिस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, शेखर काटे, नितीन धाडगे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune crime news mess cook robbery at city police arrested
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे