पुणे शहरात लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या...

रश्मी मिश्रा या महिला लष्करी अधिकार्‍यानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले. कौटुंबिक कारणावरुन आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पुणे : शहरातील वानवडी परिसरात लेफ्टनंट कर्नल असलेल्या महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (बुधवार) सकाळी उघडकीस आली आहे. रश्मी मिश्रा (वय ४३, रा. डेहराडून) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पुणे शहरात कबड्डीपटू मुलीचा खून; आरोपीला अटक

रश्मी मिश्रा या जयपूर येथे आर्मी इंटेलिजन्स मधे मूळ पोस्टिंगला होत्या. पुण्यातील पुण्यात आर्मी ट्रेनिंग स्कूल मध्ये ६ महिन्याचे ट्रेनिंग घेण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यातील ३ महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले आहे. त्यांचे पती देखील कर्नल आहेत. पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुल हे महाराष्ट्रातील एक अतिशय लोकप्रिय कॉलेज आहे. या संस्थेची स्थापना १९५० मध्ये करण्यात आली आहे. येथील संस्थेत ९ वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जातात. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.

काश्मीरमध्ये जवानांनी घेतला बदला; दहशतवादी ठार...

रश्मी मिश्रा या महिला लष्करी अधिकार्‍यानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले. कौटुंबिक कारणावरुन आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. या ठिकाणी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलिसांनी भेट दिली असून, लष्कराशी संबंधित हा सर्व प्रकार असल्याने त्याची वरिष्ठ पातळीवरुन तपासणी सुरु आहे.

Title: pune crime news lieutenant colonel women suicide at wanawdi
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे