Video:पुणे पोलिसांनी जीवाची पर्वा न करता पाठलाग करून पकडले अन्...
पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन युवकांनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.पुणे: पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन युवकांनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन धडाकेबाज पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले आणि रस्त्यातच त्यांची धुलाई केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलिसकाका पुस्तकाचे प्रकाशन! पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता बाळगून मध्यवर्ती भागात दहशत निर्माण करण्याचे कृत्य सर्रास सुरु असल्याचे समोर आले आहे. सिंहगड लॉ कॉलेज रोडवर २८ डिसेंबर रोजी दोन युवकांनी हातात चाकू सुरे घेऊन परिसरातील दुकानांमध्ये जाऊन अनेकांना भोसकले. रस्त्यात जो दिसेल त्याला चाकू दाखवून भीती दाखवत होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे. जखमी झालेल्या युवकाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुणे पोलिसांनी जीवाची पर्वा न करता पाठलाग करून पकडले...https://t.co/42LUDp7gg7#Pune #PunePolice #PoliceKaka pic.twitter.com/mlh03NHU64
— policekaka News (@policekaka) December 30, 2022
दोन युवकांबद्दल सिंहगड रोड पोलिसांना माहिती मिळाली. अक्षय इंगवले व धनंजय पाटील या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता त्या आरोपीला ताब्यात घेतले. मात्र, यातील एकाने पळ काढला. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि धुतले. पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ताब्यात घेतलेला युवक अल्पवयीन असल्याचे समजते दुसऱ्या आरोपीचे नाव करण दळवी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
सिंहगड रोड पोलिसांनी आवळल्या सराईत वाहन चोराच्या मुसक्या...
सिंहगड रोड पोलिसांची गणेश उत्सवात धडाकेबाज कारवाई...
सिंहगडरोड पोलिस ठाणे अभिलेखावरील सराईत तडीपार; पाहा नावे...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.