गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मारेकऱ्याला अटक; कृष्ण प्रकाश यांचे कौतुक...

शहरात कुठेही गैरप्रकार सुरू असतील तर थेट माझ्याशी संपर्क करा किंवा मॅसेज करून कळवा, असे आवाहन कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.

पुणे: पिंपरी-चिंचवड मधील गोल्डमॅन आणि सोन्याचा शर्ट घातल्यामुळे चर्चेत आलेले दत्ता फुगे यांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेला प्रमोद उर्फ कक्का धौलपुरी याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 3 देशी पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

पुण्याच्या गोल्डमॅनवर पत्नीने केला गंभीर आरोप...

पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आरोपी पेरॉलवर बाहेर आला होता, तेव्हापासून त्याने भोसरी परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे पिस्टल असल्याचेही अनेकांनी बघितले होते. मात्र, त्याच्या भीतीने कुणीच पोलिसांकडे तक्रार करत नव्हते. मात्र एका सजग नागरिकाने मला व्हॉट्सअॅपवर मसेज करून धौलपुरीया बद्दल माहिती दिली आणि त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलबद्दलही सांगितले. अधिकारी आणि कर्मचारी पाठवून मोठ्या शिताफीने धौलपुरीयाला अटक केली.'

पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी वेषांतर करून केली पाहणी...

केवळ व्हॉट्सअॅप आलेल्या एका मॅसेजवरुन पोलिसांनी केलेल्या या कामगिरीच सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. शहरात कुठेही गैरप्रकार सुरू असतील तर थेट माझ्याशी संपर्क करा किंवा मॅसेज करून कळवा, असे आवाहन कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.

चाकणमध्ये दीड लाखांचा गुटखा जप्त; कृष्णप्रकाश यांचा दणका...

कोण होता गोल्डमन दत्ता फुगे
कक्का धौलपुरीया अटक झाल्यामुळे गोल्ड मॅन दत्ता फुगे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भोसरी परिसरातील रहिवासी असलेले फुगे यांना सोने परिधान करण्याची प्रचंड हौस होती. याच हौसे पोटी फुगे यांनी तब्बल 3 किलो सोन्याचा शर्ट तयार करून घेतला होता, ज्यामुळे फुगे यांची गोल्डमन म्हणून जगभर ओळख निर्माण झाली होती. मात्र याच खोट्या प्रतिष्ठेपायी फुगे यांचे अनके शत्रू तयार झाले होते. फुगे वक्रतुंड नावाने चिटफंडही चालवायचे. ज्यामध्ये त्यांनी अफरातफर केल्याचे आरोपही झाले होते आणि जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याने फुगे अनेक आर्थिक व्यवहार वादात सापडले आणि अशाच एका आर्थिक व्यवहारातून 15 जुलै 2016 ला दिघी परिसरातील भारतमाता नगर येथे धौलपुरीयायाने आपल्या इतर साथीदारांसह गोल्डमम फुगेचा दगडाने ठेचून खून केला होता.

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना अश्रू झाले अनावर...

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद...

पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची जोरदार फलंदाजी...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune crime news goldman datta fuge murder case police one ar
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे