धक्कादायक! पुणे शहरात मुलीचा कोयत्याने सपासप वार करून खून

एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पुणे: बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत आठवीमध्ये शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय मुलीचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) सायंकाळी घडली. बिबेवाडीचा यश लॉन्स परिसरात ही घटना घडली असून, या घटनेने संपूर्ण पुणे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. ती कबड्डीपटू होती. आज सायंकाळी ती मित्र मैत्रिणी सोबत कबड्डीचा सराव करत होती. त्या ठिकाणी आलेल्या एका तरुणाने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि सोबत आणलेल्या कोयत्याने आरोपीने क्षितिजाच्या गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या क्षितीजाचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपीने त्यानंतर त्याने घटनास्थळीच कोयता आणि सोबत आणले शस्त्र टाकून देऊन पळ काढला.

दरम्यान, एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Title: pune crime news girl attack and murder at bibwewadi police
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे