मोबाईल चोरी करणारा सराईत पोलिसांच्या जाळयात...

सराईत चोर असून गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरी करणे, तसेच उघडया दरवाज्यावाटे प्रवेश करून मोबाईल चोरी करणे हि त्याची गुन्हा करण्याची पद्धत आहे.

पुणेः मोबाईल चोरी करणारा सराईत पोलिसांचे जाळयात अडकला आहे. पुणे शहरातून विविध ठिकाणाहून चोरी केली असल्याचे सांगून विविध पोलिस स्टेशनचे खालीलप्रमाणे दाखल गुन्हे उघडकीस आले आहेत.

पुणे शहरात 'बालस्नेही कक्षाची' स्थापना...

११/११/२०२१ रोजी भरत कानसिंग राजपुरोहित (वय ३० वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. १०,११, रामेश्वर मंदिरजवळ, रामेश्वर चौक, शुक्रवार पेठ, पुणे. मूळ रा. गाव पुनडिया, ता. राणी, जि. पाली, राजस्थान राज्य ३०६११५) यांनी विश्रामबाग पोलिस ठाणे येथे समक्ष येऊन त्यांचे राहते घरातून त्यांचा व त्यांच्या सहका-याचा मोबाईल चोरी झाल्याची तक्रार दिल्याने विश्रामबाग पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. १४२/२०२१ भा.दं.वि. कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

उसतोड करताना मानवी सांगाडा आढळल्याने उडाली खळबळ...

सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलिस ठाण्याचे तपास पथकाचे प्रमुख राकेश एस. सरडे यांचेसह संजय दगडे, हेमंत पालांडे, प्रशांत शिंदे, प्रशांत पालांडे व साताप्पा पाटील असे दाखल गुन्हयातील अज्ञात चोरटयाचा शोध घेणेकामी प्राप्त सीसीटिव्ही फुटेजद्वारे शोध घेत असताना सदरचे सीसीटिव्ही फुटेज गुप्त बातमीदारांना दाखविले असता सदर शरीरयष्टीचा व्यक्ती हा कात्रज परीसरात फिरत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. सदरची बातमी वरीष्ठांना कळविली असता त्यांनी खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. परीसरात जावून दोन टिम करुन सदर आरोपीचा कसोशीने शोध घेत असताना सीसीटिव्ही फुटेजमध्ये असलेल्या वर्णनाची व्यक्ती लेन नं. १, संतोषनगर, कात्रज, पुणे येथे एका बिल्डींगच्या खाली उभा असलेला दिसून आला. तो आम्हास पाहून पळून जाऊ लागल्याने आम्ही त्यास पाठलाग करुन वरील स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन विश्रामबाग पोलिस स्टेशन येथे घेऊन आलो व त्याचेकडे नमूद गुन्हयाबाबत चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यानेच केल्याची कबुली दिली. मुरली नागराज (वय ३५ वर्ष रा. मरिअम्मा मंदिरा जवळ नागोरी जि. शिमोगा कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. त्याला पोलिस स्टेशन येथे आणून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने पुणे शहरातून विविध ठिकाणाहून चोरी केली असल्याचे सांगून विविध पोलिस स्टेशनचे खालीलप्रमाणे दाखल गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) विश्रामबाग पोलिस ठाणे, पुणे शहर गु.र.नं. १४२/२०२१ भा.दं.वि. कलम ३८०.
२) वारजे माळवाडी पोलिस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं. ३८२/२०२१ भा.दं.वि. कलम ३८०.
३) हिंजवडी पोलिस स्टेशन, पिंपरी चिंचवड शहर गु.र.नं. ८५६/२०२१ भा.दं.वि. कलम ३८०.

धक्कादायक! पुण्यात फेसबुक लाईव्ह करत वेटरची आत्महत्या...

धक्कादायक! तथाकथित महाराजाच्या मठावर टाकला छापा अन्...

सदर गुन्हयाच्या तपासामध्ये त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरी विवो, ओपो, रेडमी, रिअलमी इ. नामांकित कंपन्यांचे २२ नग महागडे मोबाईल हॅण्डसेट असा माल जप्त करण्यात आला आहे. मुरली नागराज हा सराईत चोर असून गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरी करणे, तसेच उघडया दरवाज्यावाटे प्रवेश करून मोबाईल चोरी करणे हि त्याची गुन्हा करण्याची पद्धत आहे.

पिकअपचा दरवाजा उघडा दिसला अन् धक्काच बसला...

सदरची कामगिरी ही  पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर राजेंद्र डहाळे, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ-१, श्रीमती प्रियंका नारनवरे, सहायक पोलिस आयुक्त, विश्रामबाग विभाग, बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रामबाग पोलिस स्टेशन, सुनील माने, पोलिस निरीक्षक (गुन्हे)  कुंडलिक कायगुडे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलिस उप-निरीक्षक राकेश सरडे, तसेच पोलिस अंमलदार, संजय दगडे, शरद वाकसे, हेमंत पालांडे, प्रशांत शिंदे, प्रशांत पालांडे, सताप्पा पाटील, सर्व नेमणुक विश्रामबाग पोलिस ठाणे, पुणे यांनी केली आहे.

एटीएम लुटणाऱयांना एलसीबीकडून मोठ्या शिताफीने अटक

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune crime news faraskhana police arrested for mobile robber
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे