लक्ष द्या! तुमच्या सीमकार्डची मुदत संपली आहे...

तुमच्या सीमकार्डची मुदत संपली आहे. संबंधित सीमकार्ड सुरू ठेवायचे असल्यास 24 तासांच्या आत अपडेट करून घ्यावे लागेल.

पुणे: तुमच्या सीमकार्डची मुदत संपली आहे. संबंधित सीमकार्ड सुरू ठेवायचे असल्यास 24 तासांच्या आत अपडेट करून घ्यावे लागेल. सीमकार्ड अपडेट करायचे असल्यास दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, अशा प्रकारे सांगून एकाने वृद्ध महिलेला (वय 57) तब्बल 10 लाख 85 हजार रुपयांना लुबाडल्याची घटना घडली आहे. महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गात अज्ञात सायबर चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

औषध बनविणाऱ्या कंपनीलाच घातला ऑनलाईन लाखोंचा गंडा...

फिर्यादी महिला वानवडी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहते. 4 फेब्रुवारी रोजी एका अज्ञात सायबर चोरट्याने फिर्यादीला एक बीएसएनएल कंपनीचा लोगो पाठवला. तसेच आपण बीएसएनएल कंपनीतील माजी कर्मचारी असून, कोथरूडमधून बोलत आहे, असे खोटे सांगितले. सीमकार्ड अॅक्टिव्हेशनची ऑनलाइन प्रक्रिया बंद असून, त्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया करावी लागेल, असे महिलेला सांगितले.

देशात काय चाललंय ! कुणीही उठून स्वत:चे यूट्यूब चॅनेल सुरू करतोय...

सीमकार्ड अपडेट करण्यासाठी आरोपीने फिर्यादीकडून त्यांच्या बँक खात्याची माहिती मागवून घेतली. यानंतर आरोपीने एटीएमच्या सीव्हीसी क्रमांकाचा वापर करून 75 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर 10 लाख 10 हजार रुपयांचे ऑनलाइन ट्रान्झेक्शन केले. सायबर चोरट्यानं फिर्यादी महिलेला गंडा घातला आहे. घटनेच्या जवळपास सात महिन्यांनतर फिर्यादीनं वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी फसवणूक आणि सायबर गुन्ह्याच्या अन्य कलमांतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच संबंधित व्हॉट्सअॅप क्रमांक आणि बँक खात्याच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune crime news cheat old woman under pretext of updating si
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे