बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचला अन् आरोपींवर घातली झडप...

राखाडी रंगाचे नायलॉनचे पोत्याबाबत विचारणा करता तीघेही उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे देवू लागल्याने त्यांना ताब्यात घेतले.

पुणे: बिबवेवाडी पोलिसांनी २,६६,००० रुपये किंमतीचा १० किलो २५५ ग्रॅम गांजा आणि विक्री करणा-या तीन आरोपींना पोलिस ठाणे हद्दीतून शिताफिने पकडले असून, पुढील तपास करत आहेत.

देशात बॉम्बस्फोट घडवण्याच्या मोठा कट लावला उधळून...

रविवारी (ता. 12) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बिबवेवाडी पोलिस ठाणे तपास पथकातील सहाय्यक पोलिस उप-निरीक्षक दिपक मते यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, दोन व्यक्ती हे त्यांचेकडील दुचाकी गाडीवरुन गांजा हा अंमली पदार्थ घेवून अप्पर बसडेपो मधील लाईट हाऊस या बिल्डींगच्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीस विक्री करीता येणार आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल झावरे, पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाने मिळालेल्या बातमीवर कारवाई करणेकामी सहा.पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, सहा.पोलिस उप-निरीक्षक दिपक मते व तपास पथकातील स्टाफ यांना आदेश दिल्याने त्यांनी बातमीचे ठिकाणी जावून पुर्व नियोजन करुन तसा सापळा रचला. बातमीप्रमाणे खात्री होताच २,६६,००० रुपये किंमतीचा १० किलो २५५ ग्रॅम बिया बोंड्याचा गांजा हा अमलीपदार्थ असलेला राखाडी रंगाचे नायलॉनचे पोते घेवून आलेल्या दोन व्यक्तींना झडप घालून पकडले. विकत घेणा-यासह एका व्यक्तीस पकडून मोठी कामगीरी केली आहे.

धक्कादायक! अल्पवयीन मुलीला फूस लावून घेऊन गेला अन्...

आरोपींची नावे १) अजिक्य सुरेश माझिरे, (वय २८ वर्षे रा. भैरवनाथ मंदिराजवळ, नवयुग तरूण मंडळाजवळ, खडकवासला, ता.हेवली, जि.पुणे), २) प्रविण सुरेश कांबळे (वय ३० वर्षे रा. आझाद मित्र मंडळाजवळ, खडकवासला, ता. हवेली, जि. पुणे) व विकत घेणारा १) राहूल प्रभू सोनवणे (वय ३६ वर्षे रा.पद्मावती वसाहत, पद्मावती मंदिराजवळ, पद्मावती, पुणे) अशी आहेत. सपोनि श्री. काळुखे यांनी प्रथम नमुद व्यक्तींकडे मिळून आलेल्या राखाडी रंगाचे नायलॉनचे पोत्याबाबत विचारणा करता तीघेही उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे देवू लागल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडी राखाडी रंगाचे पोत्याचे तोंड खोलून पाहता त्यामध्ये पारदर्शक प्लॅस्टिकचे पिशवीमध्ये काळसर रंगाचे बिया बोंडे असलेला गांजा सदृश पदार्थ बेकायदेशिररित्या विक्री करीता आणल्याचे दिसून आले. 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव घेऊन दिला दम...

गांजा अंमलीपदार्थ जप्त करुन त्यांचे विरुध्द बिबवेवाडी पोलिस स्टेशन येथे NDPS कायादद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. तीन आरोपींना अटक करुन त्यांचेकडून गांजा हा अंमली पदार्थासह त्यांनी १० किलो २५५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ वाहतुकीसाठी वापरलेली हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल असा एकुण २,६६,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. सपोनि श्री. काळुखे यांनी आरोपींनी गांजा हा कोठुन आणला, आणखी गांजा या अंमली पदार्थाचा त्यांचेकडे साठा आहे काय? याबाबत आरोपीताकडे तपास करण्यासाठी त्यांची न्यायालयातtन दिनांक १५.०९.२०२१ रोजी पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड घेतली आहे.

धक्कादायक! पुणे शहरात प्रेयसीचा सपासप वार करून खून...

सदरची कारवाई ही अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, परिमंडळ ०५ चे पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, वानवडी विभागाचे सहा.पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल झावरे व पोलिस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक, प्रविण काळुखे, सहा.पोलिस उपनिरीक्षक, दिपक मते, पोलिस अंमलदार तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी, सतिश मोरे, सचिन फुंदे, अतुल महांगडे व राहुल शेलार यांनी केली आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune crime news bibwewadi police three arrested for cannabis
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे