पुणे शहरात जुन्या भांडणाच्या वादातून कोयत्याने मारहाण...

जुन्या भांडणांचा वादातून ताडीपार व्यक्तीस जिवे ठार मारण्याचे उददेशाने कोयत्याने मारहाण करणाऱ्या आरोपींना भारती विदयापीठ पोलिसांची अटक केली आहे.

पुणेः जुन्या भांडणांचा वादातून ताडीपार व्यक्तीस जिवे ठार मारण्याचे उददेशाने कोयत्याने मारहाण करणाऱ्या आरोपींना भारती विदयापीठ पोलिसांची अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

चोरट्यांनी मध्यरात्री बेडरूमच्या कड्या लावल्या अन्...

संतोषनगर कात्रज येथे राहाणारे ऋषिकेश राजेंद्र बरडे (वय २१ वर्षे, रा. घुगुरवाले चाळ, संतोषनगर, कात्रज, पुणे) व इस्माईल मकानदार यांच्या मध्ये शनिवार (ता. 11) दुपारी भांडणे झाली होती. दुपारच्या सुमारास हृषीकेश बरडे हा त्याचा मित्र सोनू कांबळे याच्यासह दुचाकीवरुन वाईला जात असताना अगोदर झालेल्या भांडणाच्या कारणावरुन यातील इस्माईल मकानदार त्याचा लहान भाऊ व त्यांचे साथीदार गणेश भंडलकर, समीर शेख, कैफ व इतर ३ ते ४ यांनी हृषीकेश बरडे यास अडवून लाथाबुक्यांनी मारहाण केली. इस्माईल मकानदार, गणेश भंडलकर व कैफ यांनी त्याला जिवे ठार मारण्याचे उददेशाने त्यांचे जवळील कोयत्यांनी हृषीकेश बरडे याचे डोक्यात पाठीवर, दोन्ही हाताच्या मनगटावर उजव्या हाताच्या बोटांवर जबर वार करुन त्याला गंभीर जखमी केले. हृषीकेश बरडे याने दिलेल्या तक्रारीवरुन इस्माईल मकानदार, गणेश भंडलकर, समिर शेख, कैफ व इतर ३ ते ४ यांचे विरुध्द भारती विदयापीठ पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६३८/२०२१, भादवी कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६, आर्म अॅक्ट ४ (२५) महा. पोलिस अधि. ३७ (१) (३) सह १३५, क्रिमिनल अंबेडमेंट अॅक्ट ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

धक्कादायक! पुणे शहरात प्रेयसीचा सपासप वार करून खून...

वरील गुन्हयातील आरोपी असलेल्या गणेश विजय भंडलकर याने फिर्यादी हृषीकेश बरडे व त्याचे साथीदार यांचे विरुध्द क्रॉस तक्रार दिली की, दिनांक ११/०९/२०२१ रोजी ०४/०० वाजताचे सुमारास मी व माझे मित्र इस्माईल मकानदार व सलमान नायाब असे न्यु एकता मित्र मंडळ चौक, संतोषनगर, कात्रज येथे गप्पा मारत उभे असताना त्याठिकाणी ऋषिकेश बर्डे, आदीत्य ऊर्फ सोन्या कांबळे, गोविंद लोखंडे, व यश गवळी यांनी त्यांचेकडील दोन मोटार सायकलींवरुन येवुन इस्माईल मकानदार यास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व ऋषिकेश बर्डे याने इस्माईल मकानदार यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयत्याने त्याचे डोक्यात मारुन गंभीर जखमी केले, वगैरे तक्रार दिल्याने भारती विदयापीठ पोलिस स्टेशन येथे ऋषिकेश बर्डे, आदीत्य ऊर्फ सोन्या कांबळे, गोविंद लोखंडे, व यश गवळी यांचे विरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर ६३९/२०२१ भा.द.वि. कलम ३०७, ५०४, ५०६, ३४,सह आर्स अॅक्ट कलम ४ (२५) सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ व १४२ प्रमाणे नोंद करण्यात आला. सदर गुन्हयांचा पुढील तपास विजय पुराणिक, पोलिस निरीक्षक गुन्हे हे करत आहेत. 

साकीनाका बलात्कार प्रकरणी पोलिस आयुक्तांकडून महत्त्वाची माहिती...

वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी वरिल दोन्ही गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेबाबत तपास पथकातील अधिकारी नितीन शिंदे व अंकुश कर्चे व तपास पथकांचे अंमलदार यांना सुचना दिल्या. त्याप्रमाणे दोन वेगवेगळे पथक तयार करुन आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकांतील पोलिस अंमलदार अभिजीत जाधव, राहूल तांबे व विक्रम सावंत यांना हृषीकेश बरडे यास मारहाण करणारे आरोपी हे कात्रज तलावाजवळ झाडाझुडपाचे जागेत लपून बसल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी जावून आरोपी १) गणेश विजय भंडलकर (वय २१ वर्षे, रा हाजी अब्दुल शाळेजवळ इच्छापुर्ती चौक, संतोषनगर कात्रज पुणे), २) समीर रफिक शेख (वय २०, रा. कुमावत गल्ल्ली संतोषी माता मंदिराजवळ संतोषनगर कात्रज पुणे), ३) इशान इसार शेख (वय १९ वर्षे, रा.अंजनी नगर कात्रज पाचबर चौक पुणे) व विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेले कोयते जप्त केले आहेत.

धक्कादायक! नर्सचा ड्रेस घालून रुग्णालयात आली अन्...

दरम्यान, इस्माईल मकानदार याला मारहान करणारे आरोपी हे जांभुळवाडी पाझर तलाव आंबेगाव खुर्द पुणे याठिकाणी लपून बसल्याची माहिती पोलिस अंमलदार धनाजी धोत्रे व शिवदत्त गायकवाड यांना मिळाली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन आरोपी १) यश भास्कर गवळी, वय १७ वर्षे, रा. फ्लॅट नं. ४०३, मंगलमुर्ती हाईटस, इंद्रायणीनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे २) गोविंद बबन लोखंडे, वय-१६ वर्षे रा. रईस बेकरीजवळ, शनिनगर, आंबेगाव खुर्द, पुणे यांना ताब्यात घेतले. दोन्ही गुन्हयांचा पुढील तपास पोलिस निरीक्षक, विजय पुराणिक हे करत असुन त्यांनी नमुद आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वरिल नमुद आरोपी यांची पोलिस कस्टडी रिमांड दिली आहे. पुढील तपास सुरू आहे. 

धक्कादायक! पुण्यातील सामूहिक बलात्काराबाबत नवी माहिती समोर...

सदरची कामगिरी सागर पाटील, पोलिस उप आयुक्त परिमंडळ ०२, पुणे शहर, श्रीमती सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त, जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संगिता यादव, पोलिस निरीक्षक (गुन्हे), पोलिस निरीक्षक विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलिस उप निरीक्षक नितीन शिंदे, अंकुश कर्चे व तपास पथकांचे अंमलदार रविन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, शिवदत्त गायकवाड, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर, यांनी केली आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune crime news bharti vidyapeeth police arrested for 2 grou
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे