पोलिस आयुक्तांचा ट्विटर लाईव्हवरून नागरीकांशी थेट संपर्क...

पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटर लाईव्हवरून नागरीकांशी थेट संपर्क साधून नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला.

पुणेः पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटर लाईव्हवरून नागरीकांशी थेट संपर्क साधून नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. सदर कार्यक्रमास नागरिकांचा अतिशय उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. तसेच २५० पेक्षा जास्त नागरिकांनी प्रश्न विचारून ४६९ पेक्षा अधिक नागरिकांनी रिट्विट केले. 

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान!

नागरिकांकरवी पोलिस आयुक्त यांना विविध विषयांवर प्रश्यांची विचारणा करण्यात आली. नागरिकांचा उत्साह पाहून पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी देखील प्रत्येक प्रश्नांस मार्मिक व अचूक उत्तर देवून नागरिकांशी अतिशय उत्साहाने प्रतिसाद दिला. नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नामध्ये मुख्यतः वाहतुक समस्या, सायबर फसवणुक व महिलां विषयी तक्रार याचा समावेश होता. त्यातील काही महत्वाच्या ३५ ते ४० प्रश्नांची उत्तरे  पोलिस आयुक्तांनी स्वतः नागरीकांना ट्विट व्दारे दिली. सोमवारी (ता. ९) १३.०० वा ते १४.१५ वा पर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?

त्यातील काही प्रश्नोत्तरे खालील प्रमाणे
उत्तर:-
१) पुणे शहरात शिकायला आलेल्या परराज्यातील विद्यार्थ्यांच्या, मुख्यतः विद्यार्थीनी व महीला यांच्या
एकुणच सुरक्षेसाठी पुणे पोलिसांची काय योजना आहे ..?
विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महाविद्यालयीन स्तरावर रॅगिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली
आहे.स्थानिक पोलिसांकडून तसेच अॅन्टी गुंडा स्कॉडतर्फे प्रत्येक परीसरात नियमित पेट्रोलींग ठेवण्यात आलेली आहे. महीलांच्या सुरक्षेसाठी १०९० या हेल्पलाईनवर महीला पोलिसांची तात्काळ सेवा उपलब्ध आहे.

पुणे पोलिस आयुक्तांकडून आणखी एका टोळीविरुद्धा मोक्का

२) Sir, we are based out of Mumbai and plan to relocate.I am thinking of
Bangalore but my wife prefers Pune. What do you suggest?
Answer:- Both are lovely cities, but the rule book says Always listen to your
wife! Everyone including me does the same.

दरम्यान, अशा प्रकारे नागरिकांच्या विविध प्रश्नांस आयुक्तांनी दिलखुलास उत्तरे दिल्याने नागरिकांनी आभार प्रकट करून असे उपक्रम वारंवार घेतले जावेत अशी विनंती केली.

ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune commissioner office ips amitabh gupta live on twitter a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे