पोलिस रेझिंग-डे सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांचे प्रबोधन...
संकटाचे वेळी तसेच पोलिस मदतीच्या वेळी पोलिस नियंत्रण कक्ष क्रमांक १००, अतिमहत्त्वाचे वेळी ११२, महिला हेल्पलाईन नंबर १०९१, विद्यार्थी बाल हेल्पलाईन १०९८ या हेल्पलाईनची माहिती दिली.पुणेः पोलिस रेझिंग-डे सप्ताहाच्या अनुषंगाने सौ. विमलाबाई गरवारे, प्रशाला येथील विदयार्थ्यांना पोलिस कामकाज विषयी मार्गदर्शन करुन प्रबोधन करण्यात आले.
रांजणगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उंचावली पोलीस दलाची मान
मंगळवारी (ता. ४) दुपारी १२/३० वा. ते १३/१५ वा. चे पर्यंत डेक्कन पोलिस ठाणे येथे पोलिस रेझिंग-डे सप्ताह निमित्त सौ. विमलाबाई गरवारे, प्रशाला पुणे येथील मुख्याध्यापक व शिक्षक यांचेसमवेत आठवी ते दहावीचे विदयार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले. रेझिंग-डे सप्ताह निमित्त डेक्कन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी संपुर्ण पोलिस ठाणे कामकाज विभाग कार्यपध्दती याबाबत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांसोबत चर्चा करुन पोलिसांकडून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना १) पोलिस काका, २) बडी कॉप, ३) दामिनी मार्शल, ४) महीला बालका संरक्षण, ५) पोलिस दिदि या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.
MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....
राज्यात पुन्हा कठोर निर्बंध; पाहा नियमावली...
संकटाचे वेळी तसेच पोलिस मदतीच्या वेळी पोलिस नियंत्रण कक्ष क्रमांक १००, अतिमहत्त्वाचे वेळी ११२, महिला हेल्पलाईन नंबर १०९१, विद्यार्थी बाल हेल्पलाईन १०९८ या हेल्पलाईनची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या बाबतची माहिती दिली. तसेच पोलिस हा २४ तास जनतेच्या संरक्षणासाठी असतात कोणताही संकोच न बाळगता पोलिस हा आपला मित्र आहे, असे समजून कोणतीही अडचण न बाळगता कोठेही कोणत्याही स्वरुपात बेकायदेशिर कृत्य/अत्याचार होत असल्यास माहिती द्यावी.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ५३वी स्थानबध्दतेची कारवाई
विदयार्थी विदयार्थीनींच्या कुतुहलपुर्ण शंका, विदयार्थ्यांच्या मनात पोलिसांविषयी असलेली भावना समजावून घेत त्यांचे निरसन केले आहे. पोलिस ठाणे येथे दैनंदिन कामकाज करतांना वापरात येणारी हत्यारे (लाठी, हेल्मेट, ढाल, पिस्तुल, कार्बाईन, गॅसगन, एस.एल.आर, पंप अॅक्शन, इंसास रायफल, रिव्हॉल्वर इ.) यांची माहिती विदयार्थ्यांना दिली.
थेट भेटः डेक्कन पोलिस स्टेशन...
सदर कार्यक्रम वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे, इतर अधिकारी व अंमलदार तसेच सौ. विमलाबाई गरवारे, प्रशाळा कडील शिक्षकवृंद हजर होता. यावेळी संगिता नाईक, अंजली अनासपुरे यांनी गरवारे शाळे तर्फे उपस्थित सर्व अधिकारी अंमलदार यांचे आभार मानले. तसेच पुणे शहर पोलिस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या रेझिंग-डे या कार्यक्रमांचे कौतुक करुन पुनश्च संपुर्ण पोलिस दलाचे आभार मानले आहेत.
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...