पुणे शहरात 'बालस्नेही कक्षाची' स्थापना...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते सहा पोलिस ठाण्यांमधील बालस्नेही कक्षांचे उद्घाटन करण्यात आले आहे.

पुणे : लहानपणी आपल्या सर्वांनाच पोलिस काकांची भीती घातली जाते. हट्ट असो व मोठ्यांना न पटणाऱ्या कोणत्याही गोष्टीत आपल्याला पोलिसांची भीती घातली जाते. पण हीच भीती दूर करून पुणे शहरातील बालकांना सुरक्षा, त्यांचे हक्क आणि उत्तम आरोग्य मिळावे यासाठी 6 पोलिस ठाण्यांत 'बालस्नेही कक्ष' उभारण्यात आले आहे.

बालकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पुणे पोलिसांकडून सिंहगड, कोथरूड, अलंकार, वारजे, उत्तमनगर, दत्तवाडी या पोलिस ठाण्यांत बालस्नेही कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते शनिवारी (ता. २०) सहा पोलिस ठाण्यांमधील बालस्नेही कक्षांचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी पोलिस सहाय्यक आयुक्त रवींद्र शिसवे, झोन 3च्या पुणे पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड होप फॉर द चिल्ड्रेन  फाउंडेशनच्या कॅरोलिन एडॉर दे बॉल्टर, शीतल अस्तित्व NGO च्या श्रीमती गायत्री कोटबागी उपस्थित होते. चिमुकल्या दोस्तांची मुख्य उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली. या मुलांनी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सहायक आयुक्त रवींद्र शिसवे यांना गुलाबपुष्प भेट दिले.

ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता...

बालकांच्या तक्रारींचे निराकरण करणे तसेच अल्पवयीन मुलांवरील दाखल गुन्हे याबाबत पोलिस तसेच होप फॉर द चिल्ड्रेन या संस्थेतील स्वयंसेवक समुपदेशन करणार आहेत. पोलिस ठाण्यांचे आवारात एखाद्याने प्रवेश केल्यास त्याला विशिष्ट वातावरण पाहायला मिळते. मात्र, बालस्नेही (चिल्ड्रेन फ्रेंडली) कक्षातील अंतर्गत रचना पूर्णपणे वेगळी असणार आहे.

बालस्नेही कक्षात मुलांच्या मनोरंजनासाठी खेळणी आहेत. त्यांना तक्रार किंवा समस्या मांडताना फारशी अडचण जाणवणार नाही. कक्षातील भिंतींवर कार्टुन्स असणार आहे. मुलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तेथे समुपदेशक असणार आहेत. कक्षात मुलांसाठी पुस्तके ठेवण्यात येणार आहेत, असे परिमंडळ तीनच्या पोलिस उपायु्क्त पौर्णिमा गायकवाड यांनी सांगितले.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune city news balsnehi kaksha oepning at six police station
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे