शिवाजीनगर पोलिसांनी महिलांसोबत अश्लिल बोलणाऱयाला दिल्लीतून केली अटक...

महिलांशी मोबाईल फोनवर संपर्क साधून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन व फसवणूक करणाऱ्या आरोपींचा शिवाजीनगर पोलिसांनी दिल्ली येथे शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.

पुणेः महिलांशी मोबाईल फोनवर संपर्क साधून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन व फसवणूक करणाऱ्या आरोपींचा शिवाजीनगर पोलिसांनी दिल्ली येथे शोध घेऊन  त्याला ताब्यात घेतले आहे.

प्रतिष्ठीत महिलांच्या फोनवर संपर्क साधून पैसे मिळविण्यासाठी गैरकृत्य करण्याचे आमीष दाखवून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या अज्ञात आरोपीविरूध्द शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे गु.नो.क. १९८/२२ भादवि कलम ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासामध्ये यातील अज्ञात आरोपी हा अनेक व्यक्तींना कॉल करून त्यांना विविध प्रलोभने दाखवून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडत असल्याचे आढळले. त्यावरून यातील अज्ञात आरोपीचे बॅक डिटेल्स प्राप्त केले असता बॅकेचा पत्ता जनकपुरी, दिल्ली व मोबाईल फोनचे टॉवर लोकेशन देखील त्याच परीसरात येत असल्याचे आढळले.

पोउनि मनीषा जाधव, पो.हा. रूपेश वाघमारे व पो.शि. आदेश चलवादी यांनी तपासकामी दिल्ली येथे पाठविले. सदर पथकाने जनकपुरी पश्चिम व पुर्व, विकासनगर, पालम विहार कॉलनी, गाझीयाबाद (उत्तरप्रदेश), हरीनगर या परीसरात सतत १३ दिवस अथक परीश्रम करून २५० सीसीटीव्हींचे फुटेज चेक करून आरोपीचे टॉवर लोकेशन, आरोपीचा वावर असलेली ठिकाणे, आरोपी वापरत असलेली बँक अकाउंट इत्यादी बाबत माहिती संकलीत केली व आरोपी वापरत असलेल्या दुचाकीचा मेक व नंबर निषन्न करून आर.टी.ओ. कडून दुचाकी मालकाची माहीती प्राप्त केली. त्यानंतर स्थानीक बातमीदार तयार करून त्यांना विश्वासात घेऊन यातील आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला व सापळा रचला.

आरोपी नामे १) चेतन मासी दासी (वय ३२, रा. विरेद्रनगर, दिल्ली), २) कविता अनिल शर्मा (वय २२, रा. उत्तमनगर, दिल्ली) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी गुन्हा कबूल केला असून गुन्हयात वापरलेल्या मोबाईल फोनसह एकूण आठ मोबाईल फोन व सिमकार्ड जप्त करण्यात आले. त्यानंतर त्यांना हरीनगर पोलिस ठाणे, दिल्ली येथे नेउन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.

सदरची कामगिरी राजेंद्र डहाळे, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, संदीपसिंह गिल्ल, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ - १ यांच्या आदेशान्वये गजानन टोन्पे, सहा. पोलिस आयुक्त, विश्रामबाग विभाग, अरविंद माने, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस ठाणे, विक्रम गौड, पोलिस निरीक्षक गुन्हे शिवाजीनगर पोलिस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि मनीषा जाधव, पो.हा. रूपेश वाघमारे, पो. शि. आदेश चलवादी यांनी केली आहे.

पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक...

पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...

'पोलिसकाका विशेषांक'

किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

 

शिवाजीनगर पोलिस स्टेशन हद्दीतील आरपी तडीपार...

शिवाजीनगर पोलिसांनी २५० सीसीटीव्ही तपासून उघड केला अपघाताचा गुन्हा...

शिवाजीनगर पोलिसांकडून अवैद्य गुटखा विक्रीवर कारवाई...

शिवाजीनगर पोलिसांनी खुनी हल्ला करणाऱयांना २४ तासात केले जेरबंद...

शिवाजीनगर पोलिसांकडून कोयता गँग जेरबंद; पाहा नावे...

शिवाजीनगर पोलिसांकडून जबरी चोरीचा गुन्हा दोन तासात उघड...​

शिवाजीनगर पोलिसांनी विविध राज्यांतून हस्तगत केले २० मोबाईल अन्...

शिवाजीनगर पोलिसांकडून जबरी चोरीचा गुन्हा उघड...

शिवाजीनगर पोलिसांनी केला वाहनचोरीचा गुन्हा २४ तासात उघड...

शिवाजीनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडून जप्त केले लाखोंचे मोबाईल...

शिवाजीनगर पोलिसांकडून वाहनचोरीचे गुन्हे उघड...

महिलेचा मोबाईल हिसकवणाऱयाला शिवाजीनगर पोलिसांनी केले जेरबंद...

शिवाजीनगर पोलिसांनी आरापीस १२ तासाच्या आत केले जेरबंद...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune city cyber crime news shivajinagar police arrest from d
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे