पुण्यातील प्रियकराने व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला प्रेयसीचा नग्न फोटो; कारण...

प्रियकराने ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीचा नग्न फोटो व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे : प्रियकराने ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीचा नग्न फोटो व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने खळबळ उडाली आहे. कोंढवा परिसरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी शिरूर तालुक्यातील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र धरमचंद फुलपगार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवक-युवती दोघेही प्रेमसंबंधात होते. काही दिवसांपूर्वी दोघाचे ब्रेकअप झालं. त्यानंतर प्रियकर देवेंद्र याने पीडितेला त्रास द्यायला सुरुवात केली. प्रियकर तिचा मानसिक छळ करत होता. या सर्व छळाला कंटाळून शेवटी तिने पोलिस ठाणे गाठले. पोलिसांकडे तक्रार दिल्यामुळे आरोपीने प्रेयसीचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. 'गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकला' फोटो व्हायरल झाल्यानंतर पीडितेला मोठा धक्का बसला. या सगळ्या प्रकरणाची तक्रार तरुणीने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात दिली. 

या प्रकरणी आरोपी असलेल्या देवेंद्रवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्याने तगादा लावला होता. गुन्हा मागे न घेतल्याने आरोपीने त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर युवतीचा विवस्त्रावस्थेतील फोटो ठेवून 'ये तो शुरुआत है' असे स्टेटस ठेवले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

इंजिनिअर पतीने केला इंजिनिअर पत्नीचा खून; काही महिन्यांचे बाळ पोरके...

हॅलो, एसबीआय बँकेमधून बँक अधिकारी मनीष शर्मा बोलतोय....

ऑनलाईन सेक्सटॉर्शन! पुणे पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन आवळल्या आरोपीच्या मुसक्या...

पुण्यात 'सेक्स तंत्र' कोर्सची जाहिरात व्हायरल; पोलिसांकडून शोध सुरू...

स्वारगेट पोलिसांनी 'यु ट्यूब'वरील बंटी-बबलीला गुजरातमधून केली अटक...

हॅलो, कॅनरा बँकेतून अमित मिश्रा बोलतोय असं म्हणाला अन्...

सावधान! पुणे ग्रामीण पोलिसांचा महत्वाचा संदेश...

बोगस वेबसाईट तयार करून अनेकांना गंडा घालणाऱया गँगचा पर्दाफाश...

Video: राज्यात ऑनलाइन फसवणुकीच्या प्रमाणात वाढः देवेंद्र फडणवीस

मोबाईलवर आलेल्या लिंकवर केले क्लिक अन् रक्कम झाली गायब...

वृद्धाच्या मोबाईलवर अनोळखी न्यूड व्हिडीओ कॉल आला अन्...

आमदार माधुरी मिसाळ यांची ऑनलाईन फसवणूक; बंटी आणि बबली ताब्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune city crime news youth arrest for girl friend photo on s
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे