तू त्या दोघांना खुप आवडतेस, शारीरीक संबंध ठेव म्हणाली अन्...
एका महिलेने तीच्या मैत्रिणीला घरी बोलावत दोघांबरोबर शरीरसंबंध ठेवण्याची 'ऑफर' दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पुणे: एका महिलेने तीच्या मैत्रिणीला घरी बोलावत दोघांबरोबर शरीरसंबंध ठेवण्याची 'ऑफर' दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेने नकार देताच तीच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पीडित महिलेने स्वत:ची सुटका करुन घेत तेथून पळ काढला. गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पीडित महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात सुवर्णा हिरवे आणि तीच्या दोन पुरुष साथीदारांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बालाजीनगर येथील सिध्दार्थ कॉम्पलेक्समध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी सुवर्णा हिरवे हिने तीच्या मैत्रीणीला घरी बोलावले होते. तेव्हा तेथे तीचे दोन पुरुष साथीदार उपस्थित होते. सुवर्णा हिने पीडित महिलेस 'तू त्या दोघांना खुप आवडतेस, तु त्यांच्या सोबत शारीरीक संबंध ठेव, मी त्यांना चार ते पाच हजार रुपये देण्यास सांगते' असे सांगितले.
पीडित महिलेने नकार देताच तीने पीडितेवर पैसे चोरल्याचा आळ घेत भांडण सुरू केले. पीडित महिला खोलीतून बाहेर येताच दोघा आरोपींनी तीचा विनयभंग करत मारहाण केली. यानंतर पीडित महिलेने सुटका करत तेथून पळ काढला. यानंतर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
विकृतपणा! पुणे शहरात सुनेच्या मासिक पाळीचं रक्त विकण्याचा प्रकार...
Video: पुणे शहरात आजी आणि नात भिडली सोनसाखळी चोराला...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.