तडीपार आदेशाचा भंग करुन केला खुनाचा प्रयत्न; युनिट ४ कडून जेरबंद...

तडीपार आदेशाचा भंग करुन खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपीस साथीदारांसह गुन्हे शाखा युनिट ४ने जेरबंद केले आहे.

पुणेः तडीपार आदेशाचा भंग करुन खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपीस साथीदारांसह गुन्हे शाखा युनिट ४ने जेरबंद केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

फिर्यादी हे जयप्रकाशनगर (येरवडा, पुणे) येथुन जात असताना सुधीर गवस, रुपेश अडागळे व एक विधीसंघर्षित बालक यांनी आपापसात संगनमत करुन, पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन, फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने सुधीर गवस याने फिर्यादीचे डोक्यात लोखंडी कोयत्याने वार करुन व इतरांनी लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण करुन दुखापत केली. त्यांचेविरुद्ध येरवडा पोलिस ठाणे गु.र.न. ४४८/२०२२, भा.द.वि. कलम ३०७,३२४,५०४, ५०६, ३४, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), म.पो.का.कलम ३७(१) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंड अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांचेविरुद्ध मारहाणीचे व मालमत्ता चोरीचे गुन्हे यापुर्वी दाखल आहेत. सुधीर चंद्रकांत गवस यांस दोन वर्षाकरीता तडीपार केले असतानादेखील आदेशाचा भंग करुन त्याने वरीलप्रमाणे गुन्हा केला आहे. नमुद गुन्हयाचा तपास करीत असताना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, नमुद आरोपी हे महाराष्ट्र गोवा सिमेवरील दोडामार्ग भागात पळून गेले आहेत. त्याअनुशंगाने पोलिस निरीक्षक गणेश माने व तपास पथकाने मिळालेल्या माहीतीचे ठिकाणी सापळा रचला. आरोपी १) सुधीर चंद्रकांत गवस (वय २३ वर्षे, रा.स.नं.१०३, माऊली चौक, जयप्रकाश नगर, येरवडा, पुणे), २) रुपेश दिलीप अडागळे (वय २४ वर्षे, रा.स.नं. १०३, माऊली चौक, जयप्रकाश नगर, येरवडा पुणे) व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले आहे. सदर गुन्हयाचा तपास येरवडा पोलिस ठाणे हे करीत आहेत. दोन आरोपींना व एक विधीसंघर्षित बालकास पुढील कारवाईसाठी येरवडा पोलिस ठाणे पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनिय कामगीरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त, गुन्हे, श्रीनिवास घाडगे, सहा.पोलिस आयुक्त, गुन्हे - २, नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ४ कडील पोलिस निरीक्षक गणेश माने, सहा. पोलिस निरीक्षक, विकास जाधव, पोलिस उप निरीक्षक, जयदीप पाटील व पोलिस अंमलदार, महेंद्र पवार, हरीष मोरे, नागेश कुँवर, सारस साळवी विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचिंम, रमेश राठोड यांनी केली आहे.

बापरे! अधिकाऱयाने बदलीसाठी सावकारांकडून घेतले लाखो रुपयांचे कर्ज...

आपण यांना ओळखता का? पोलिसांशी संपर्क साधा...

धक्कादायक! पुणे शहरात झोमॅटो बॉयने घेतला युवतीचा जबरदस्तीने किस...

पुण्याजवळ शिवशाही बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर...

पुण्यात 'सेक्स तंत्र' कोर्सची जाहिरात व्हायरल; पोलिसांकडून शोध सुरू...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ९५वी कारवाई...

पुणे जिल्ह्यात नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह; पाहा वर्णन...

सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...

भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची रवानगी येरवड्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune city crime news unit 4 arrested tadipar gangster and ot
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे