सराफ दुकानामध्ये चोरी करणाऱया महिलांना युनिट २ने केले जेरबंद...

सराफ दुकानामध्ये चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलांना गुन्हे शाखा युनिट-२ ने शंभरहून अधिक CCTV कॅमेरांच्या मदतीने शिताफिने जेरबंद केले आहे.

पुणेः सराफ दुकानामध्ये चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलांना गुन्हे शाखा युनिट-२ ने  शंभरहून अधिक CCTV कॅमेरांच्या मदतीने शिताफिने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस सराफ दुकानामध्ये दागिने खरेदी करण्याचे बहाण्याने सराफ दुकानदाराची नजर चुकवून सोन्या-चांदीचे दागिने चोरीचे गुन्हयामध्ये वाढ होत असल्याने, आशा चोऱ्या करणारे रेकॉर्डवरील महिला गुन्हेगारावर पाळत ठेवण्या बाबत रामनाथ पोकळे, अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर यांनी आदेश दिले होते. त्याअनुषाने हडपसर पोलिस स्टेशन गु.र.नं. १३६/२०२३ भा.द.वि. कलम ३८० या गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. युनिट-२ प्रभारी वपोनि क्रांतीकुमार पाटील यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस उप-निरीक्षक नितीन कांबळे व Unit-2 कडील एक स्वतंत्र टिम तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले होते. 

युनिट-२ कडील पोलिस अमंलदार गजानन सोनुने व उज्वल मोकाशी यांनी दाखल गुन्हयाचे ठिकाणी जावून, शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासुन, गुन्ह्यात वापरलेली रिक्षाचा आर.टी.ओ. नंबर प्राप्त करुन, सदर रिक्षा चालकास ताब्यात घेतले. त्याकडे सखोल तपास केला असता, त्याच्या संपर्कातील नेहमीचे ग्राहक महिला उषा रिटे व संगिता रिटे (रा. विठ्ठल नगर, वारजे पुणे) असे असल्याचे निष्पन्न झाले. सदरच्या महिला या नटराज हॉटेल येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली असता वरील स्टाफच्या मदतीने सापळा लावुन शिताफिने ताब्यात घेतले. १) उषा दत्ता रिटे वय ४५ वर्षे, रा. विठ्ठल नगर, वारजे पुणे २) संगिता प्रकाश रिटे वय ५० वर्षे, रा. सदर असे आहे. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असता, त्यांना दाखल गुन्हयात दिनांक २०/०१/२०२३ रोजी १६/३० वाजता अटक करण्यात आलेली आहे. 

पोलिस अटकेत त्यांच्या ताब्यातून दाखल गुन्हयातील ४०,००० रुपये किमंतीची ४५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पुणे शहरामधील इतर गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. अधिक तपास गुन्हे शाखा युनिट-२ करीत आहे. सदर महिला या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. या महिला रिक्षाने सराफ दुकाणामध्ये ग्राहक म्हणुन जातात व सराफाची नजर चुकवून सोन्या-चांदीचे दागिने चोरी करत होत्या.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, अप्पर पोलिस आयुक्त, रामनाथ पोकळे, पोलिस उप-आयुक्त, अमोल झेंडे, सहा.पो.आयुक्त गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा युनिट-२, पुणे शहर पोलिस उप-निरीक्षक नितीन कांबळे, पोलिस अमलंदार उज्वल मोकाशी, गजानन सोनुने, संजय जाधव, रेश्मा उकरडे, साधना ताम्हाणे, विनोद चव्हाण, उत्तम तारु, मोहसिन शेख, शंकर नेवसे, निखील जाधव, गणेश थोरात, नागनाथ राख, समिर पटेल, कादीर शेख, यांनी केली आहे.

पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...

'पोलिसकाका विशेषांक'

किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

पीएमटी बस मध्ये चोरी करणाऱयास युनिट २ने केले जेरबंद अन्...

पुणे शहरात बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी उकणारा युनिट २ कडून जेरबंद...

कोरेगाव पार्क येथे दहशत निर्माण करणाऱया आरोपींना युनिट २कडून अटक...

रिक्षा चोरास चोरीच्या रिक्षासह युनिट 2 ने घेतले ताब्यात अन्...

पुणे शहरात युनिट २ कडून आणखी एक आरोपी जेरबंद...

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हे शाखा युनिट 2 कडून जरेबंद...

खुन करण्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारांना युनिट २ने केले जेरबंद...

पुणे शहरात दिवाळीनिमित्त प्रवाशांना लुटणारी टोळी युनिट २ कडून जेरबंद...

पुणे शहरात ४० लाखांची खंडणी मागणारा युनिट २ कडून जेरबंद...

पुणे शहरात इंजेक्शनची विक्री करणाऱयाला युनिट-२ने केली अटक...

पोक्सो गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी युनिट २ कडून जेरबंद...

गुन्हे शाखा युनिट 2ने गुन्हेगाराला पाठलाग करून पकडले; दोन पिस्टल जप्त...

युनिट-२च्या पथकाने वेशांतर करून 'चोर राजा'ला केले जेरबंद अन्...

पुणे शहरात युनिट २ने आरोपींकडून महागडे मोबाईल केले हस्तगत...

पुणे शहरामध्ये गणेश उत्सवाच्या पार्श्वभुमीवर युनिट २ची मोठी कारवाई...

बंटी-बबलीला लाखो रुपयांच्या दागिन्यांसह युनिट-२ ने केली अटक...

गावठी पिस्टल बाळगणाऱयास युनिट-२ कडून जेरबंद...

युनिट- 2 कडून जबरी चोरी व दरोड्यातील आरोपी जेरबंद...

गुन्हे शाखा युनिट 2ने गुन्हेगारास पाठलाग करून पकडले अन् गुन्हे उघड...

रेशनिंग तांदळाचा लाखो रुपयांचा काळाबाजार युनिट 2ने केला उघड...

मोक्का गुन्हयातून बाहेर आलेला गुन्हेगार युनिट 2 कडून जेरबंद...

युनिट 2 कडून पाच सराईतांसह तडीपार गुन्हेगार जेरबंद...

पालखी बंदोबस्तादरम्यान युनिट 2ने केले एकाला जेरबंद...

पालखी बंदोबस्तादरम्यान युनिट 2ने पाठलाग करून एकाला केले जेरबंद...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune city crime news unit 2 team arrest two women for gold r
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे