पालखी बंदोबस्तादरम्यान युनिट 2ने केले एकाला जेरबंद...
पालखी बंदोबस्तादरम्यान गंभीर दुखापत व राईट या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला युनिट- 2ने जेरबंद केले आहे.पुणेः पालखी बंदोबस्तादरम्यान गंभीर दुखापत व राईट या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला युनिट- 2ने जेरबंद केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ८५वी कारवाई...
पोलिस उप-निरीक्षक नितीन कांबळे, पोलिस अंमलदार शंकर नेवसे, निखिल जाधव, गजानन सोनुने, नागनाथ राख असे पालखी बंदोबस्त या अनुषंगाने युनिट- 2, हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना युनिट-2 कडील पोलिस कॉन्स्टेबल ८१३६ निखिल जाधव यांना माहिती मिळाली की, खडक पोलिस स्टेशन कडील गंभीर दुखापत व राईट या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी शशिकांत उर्फ चिकू उर्फ चिक्कु चंद्रकांत भोंडे (रा. 633 गंजपेठ पुणे) हा ससून हॉस्पिटल येथील चौकात थांबला असल्याची बातमी मिळाली होती. वपोनि क्रांतीकुमार पाटील यांना कळविल्यानंतर त्यांनी आरोपीला ताब्यात घेणे बाबत आदेशित केले होते. स्टाफचे मदतीने संबंधित ठिकाणी जाऊन वरील आरोपीस ताब्यात घेऊन युनिट २ कार्यालयात आणले. त्याच्याकडे अधिक चौकशी करता तो खडक पोलिस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी असलेबाबत निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीला वैद्यकीय तपासणी करुन त्यास पुढील कारवाई साठी खडक पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
पालखी बंदोबस्तादरम्यान युनिट 2ने पाठलाग करून एकाला केले जेरबंद...
सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उप-आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे -१ गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो. उप-नि. नितीन कांबळे, पोलिस अंमलदार शंकर नेवसे, निखिल जाधव, गजानन सोनुने, कादिर शेख, नागनाथ राख यांनी केली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांचे वारीदरम्याचे अनुभव...
पुणे पोलिसांकडून पालखी सोहळयाचे प्रत्येक अपडेट 'एका क्लीकवर'
थराराक! चित्त्याच्या चपळाईने शस्त्रसज्ज आरोपीवर घेतली झेप...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...