पालखी बंदोबस्तादरम्यान युनिट 2ने पाठलाग करून एकाला केले जेरबंद...
पालखी बंदोबस्तादरम्यान जबरी चोरी करणारा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास युनिट 2 ने पाठलाग करून जेरबंद केले आहे.पुणेः पालखी बंदोबस्तादरम्यान जबरी चोरी करणारा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास युनिट 2 ने पाठलाग करून जेरबंद केले आहे. याबाबत पुढील तपास करत आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांचे वारीदरम्याचे अनुभव...
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशान्वये युनिट 2 चे प्रभारी क्रांतीकुमार पाटील यांचे सोबत पुणे शहरात पालखी बंदोबस्ताचे अनुषंगाने युनिट २ चे हददीत ससून हॉस्पीटल समोर रोडवर पालखी पेट्रोलिंग बंदोबस्त करीत असताना पो.शि .८४० ९ समीर पटेल व पो.शि. १०७४३ कादिर शेख यांना साधू वासवाणी चौकाजवळील रोडवर पालखीचे गर्दीमध्ये एक जण संशयीत रित्या फिरत असताना दिसून आला. युनिट २ चे प्रभारी क्रांतीकुमार पाटील यांना कळवले असता त्यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी. नितीन कांबळे, पो.शि समीर पटेल, पो शि. कादिर शेख, पो हवा शंकर नेवसे, पो.शि ८४०३ गजानन सोनुने, म.पो.हवा. साधणा ताम्हाणे व राख यांनी संबंधित व्यक्तीस थांबण्यास सांगीतले. त्यानंतर त्याने आमचेकडे पाहून न थांबता तेथून पुढे पळून जावू लागला. त्यांस आम्ही वरील स्टाफचे मदतीने थोडया अंतरावर पाठलाग करुन आज (बुधवार) चारच्या सुमारास ताब्यात घेतले.
कोरेगाव पार्क परीसरात मसाज स्पा सेंटरवर छापा; परदेशी महिलांची सुटका...
प्रेमराज राजेश पट्टपु (वय २२ वर्ष रा. शिंदेवस्ती पी.एम.सी. शाळेमागे शौचालयाजवळ हडपसर पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याच्या हातात एक काळ्या रंगाचा मोबाईल फोन होता. सदर मोबाईल फोन कोणाचा आहे असे विचारले असता त्याने उपयुक्त माहिती दिली नाही. सदर फोन बाबत त्याचेकडे चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर त्याने सदर मोबाईल फोन हा १४/०६/२०२२ रोजी रात्री ९ / ३० वा सुमारास त्याचा साथीदार दिपक ऊर्फ दिप्या (रा. देहुरोड पुणे) याचे सोबत साधू वासवाणी चौकाजवळ वुडलँड हॉटेल पाठीमागुन जबरी चोरी केले बाबत सांगीतले. त्यानंतर सदर मोबाईल फोन बाबत खात्री करता बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि क्रमांक १५ ९ / २०२२ भा.द.वि.क. ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल असलेबाबत माहिती मिळाली. आरोपीचे मेडिकल तपासणी करून पुढील कार्यवाहीस बंडगार्डन पोलिस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पुणे पोलिसांकडून पालखी सोहळयाचे प्रत्येक अपडेट 'एका क्लीकवर'
सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे टॉम्पे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. क्रांतीकुमार पाटील, पो.उप.निरी. नितीन कांबळे, पोलिस अंमलदार शंकर नेवसे, समीर पटेल, कादिर शेख, गजानन सोनुने, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, नागनाथ राख यांनी केली आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ८४वी कारवाई
थराराक! चित्त्याच्या चपळाईने शस्त्रसज्ज आरोपीवर घेतली झेप...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...