गुन्हे शाखा युनिट 2ने गुन्हेगाराला पाठलाग करून पकडले; दोन पिस्टल जप्त...

पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर अग्निशस्त्र दाखवून लुटमारीचे प्रकारात वाढ झाली असून, सदर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले होते.

पुणेः शिक्षा भोगलेल्या, सराईत तडीपार, रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा पाठलाग करून त्याचे कडून दोन पिस्टल, तीन गावठी कट्टे व 3 राऊंड असा एकूण 1,41,000 मुद्देमाल जप्त करण्यात गुन्हे शाखा युनिट 2ला यश आले आहे.

पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर अग्निशस्त्र दाखवून लुटमारीचे प्रकारात वाढ झाली असून, सदर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले होते. युनिट 2 कडील प्रभारी अधिकारी क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आलेली होती. त्याप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक, विशाल मोहिते, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलिस उपनिरीक्षक, नितीन कांबळे व स्टाफ असे युनिट 2 हद्दीत पेट्रोलिंग फिरत असताना, सेंट्रल स्ट्रीट चौकीजवळ आले असता पो शि 10743 कादिर शेख व पो शि 8409 समीर पटेल यांना बातमीदारा मार्फतीने बातमी मिळाली की, समर्थ पोलिस स्टेशन कडून तडीपार केलेला रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण हा खड्डा गॅरेज मंगळवार पेठ पुणे येथे जवळ पिस्टल बाळगून थांबलेला आहे.  युनिट प्रभारी क्रांतीकुमार पाटील यांनी आदेश दिले असता घटनास्थळी जाऊन त्याचा पाठलाग करून 15/ 9 /2022 रोजी ताब्यात घेतले. रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (रा. 207 सोमवार पेठ पुणे 11 दारूवाला पूल श्रेयश अपार्टमेंट सध्या रा. वेणू आपार्टमेंट तिसरा मजला निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवड पुणे) असे त्याचे नाव आहे.

सदर आरोपी पुणे पोलिस अभिलेखा वरील गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी शरीराविरुद्ध गुन्हे करणारा आहे. पुणे शहरात आर्म अॅक्ट व जबरी चोरीचे 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत तसेच एका गुन्ह्यात पाहिजे आरोपी असून समर्थ पोलिस स्टेशन कडून पुणे जिल्ह्यातून तडीपार आहे.
1) येरवडा पोलिस स्टेशन गुन्हा रजी क्रमांक -584 /2022 भादविक 427, 504 आर्म अॅक्ट 4/25, मपो अॅक्ट 37(1)3 सह135
2) सांगवी पोलिस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक 284/ 2022 ,भादविक- 452, 509, 143, 147, 149, 323, क्रिमिनल लॉ अँमेंनटमेंनट कलम 1932 चे कलम 7
3) समर्थ पोलिस स्टेशन येथून पोउपआय  परी -2 यांचे कडील आदेश क्रमांक 10 /21 अन्वये 22/ 2/ 21.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्रीनिवास घाडगे, सहा पोलिस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा युनिट -२ पुणे शहर, सपोनि विशाल मोहिते, पोउपनिरी राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे, पोलिस अंमलदार, शंकर विनोद चव्हाण, गणेश थोरात राहुल राजपुरे, संजय जाधव, गजानन सोनुने, विजयकुमार पवार, प्रमोद कोकणे, उज्वल मोकाशी, उत्तम तारू, समीर पटेल ,कादिर शेख, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, नागनाथ राख या पथकाने केली आहे.

युनिट-२च्या पथकाने वेशांतर करून 'चोर राजा'ला केले जेरबंद अन्...

पुणे शहरात युनिट २ने आरोपींकडून महागडे मोबाईल केले हस्तगत...

पुणे शहरामध्ये गणेश उत्सवाच्या पार्श्वभुमीवर युनिट २ची मोठी कारवाई...

बंटी-बबलीला लाखो रुपयांच्या दागिन्यांसह युनिट-२ ने केली अटक...

गावठी पिस्टल बाळगणाऱयास युनिट-२ कडून जेरबंद...

युनिट- 2 कडून जबरी चोरी व दरोड्यातील आरोपी जेरबंद...

गुन्हे शाखा युनिट 2ने गुन्हेगारास पाठलाग करून पकडले अन् गुन्हे उघड...

रेशनिंग तांदळाचा लाखो रुपयांचा काळाबाजार युनिट 2ने केला उघड...

मोक्का गुन्हयातून बाहेर आलेला गुन्हेगार युनिट 2 कडून जेरबंद...

युनिट 2 कडून पाच सराईतांसह तडीपार गुन्हेगार जेरबंद...

पालखी बंदोबस्तादरम्यान युनिट 2ने केले एकाला जेरबंद...

पालखी बंदोबस्तादरम्यान युनिट 2ने पाठलाग करून एकाला केले जेरबंद...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune city crime news unit 2 arrest gangster and two pistol a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे