पुणे शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चो-या करणारी टोळी जेरबंद

सदरचे मोबाईल फोन त्यांनी पुणे शहर, खराडी, चंदननगर, वडगाव शेरी या भागातून चोरल्याचे पोलिसांना सांगीतले आहे.

पुणेः युनिट १ गुन्हे शाखेला पुणे शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चो-या करणारी टोळी जेरबंद करण्यात यश आले आले. पाऊण लाख रुपयाचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

इंजिनिअरकडून रागाच्या भरात घडली मोठी घटना...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व पोलिस सह आयुक्त पुणे यांनी पुणे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये व जनतेच्या मालमत्तेचे रक्षण व्हावे तसेच कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे शहरातील पोलिस अभिलेखावरील टोळीतील गुंड, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चो-या करणारे सराईत गुन्हेगार यांचा शोध घेवून त्यांचे हालचालीवर नजर ठेवून त्यांचेविरुध्द कठोर कारवाई करणेबाबत सर्व पोलिस अधिकारी यांना वेळोवेळी आदेश दिलेले आहेत.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

०८/०१/२०२२ रोजी युनिट - १ गुन्हे पुणे शहर येथील पोलिस अधिकारी व अंमलदार अभिलेखावरील गुन्हेगार चेक करत असताना पोलिस अंमलदार अजय थोरात यांना त्यांचे खब-याकडून माहिती मिळाली की, पुणे शहरात गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचे मोबाईल चोरणारी टोळी कार्यरत आहे. त्यांचेपैकी दोघेजण चोरीचे मोबाईल फोन विकण्यासाठी यशवंत नगर, खराडी, चंदननगर येथील बाजारपेठेत येणार आहे, अशी माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी त्याठिकाणी सापळा लावला. आपलेजवळील मोबाईल फोन विकण्यासाठी आलेले संशयीत मुकेश शिवलाल दिवाकर (वय-२१ रा-यशवंत नगर, जुने साईबाबा मंदीरमागे, खराडी पुणे मुळ पत्ता - मुपो जलालपुर जवाहरगंज पोस्ट तिलापुर जिल्हा-कोसंबी उत्तरप्रदेश) व दिपककुमार मोहन जयस्वाल (वय - २३ रा-चंदन नगर चौपाटी, पुणे मुळ पत्ता-मुपो गाव परसोहिया पोस्ट-माथाबाजार जिल्हा - सिध्दार्थनगर उत्तप्रदेश) यांना ताब्यात घेतले आहे. त्यावेळी त्यांच्या ताब्यातून दोन सॅमसंग, दोन रेडमी, दोन ओपो, दोन एमआय कंपनीचे असे एकूण आठ मोबाईल फोन किंरु ७६,०००/- चे जप्त करण्यात आले आहेत. 

आईच्या प्रियकराला पाहून मुलगा संतापला अन्...

सदरचे मोबाईल फोन त्यांनी पुणे शहर, खराडी, चंदननगर, वडगाव शेरी या भागातून चोरल्याचे पोलिसांना सांगीतले आहे. त्यांचा एक साथीदार फरार असून, त्याचा शोध चालू आहे. तृप्ती संजय छाजेड (वय - २२ रा - नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी, पुणे) यांनी त्यांचे मालकीचे रिलायबल ट्रेडिंग कंपनी, व्दारका गार्डन, सुनितन नगर वडगाव शेरी पुणे येथुन संशयीत आरोपींनी मोबाईल फोन चोरल्याबाबत चंदन नगर पो. स्टे पुणे येथे तक्रार दिलेली आहे. आरोपींकडून चंदन नगर पो स्टे कडील तीन विश्रामबाग पो स्टे कडील एक असे मोबाईल फोन चोरीचे चार गुन्हे उघडकीस आलेले आहे व इतर मोबाईल फोनबाबत तपास चालू आहे.

धक्कादायक! प्रीती कॉलेजला गेलीच नाही; तर...

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अभिताभ गुप्ता, डॉ. रविंद्र शिसवे सह पोलिस आयुक्त,पुणे शहर, रामनाथ पोकळे अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर,  श्रीनिवास घाडगे पोलिस उप-आयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरीष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, पोलिस उप निरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलिस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे महिला पोलिस अंमलदार मिना पिंजण यांनी केली आहे.

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

धक्कादायक! कोरोना आणि लॉकडाऊनने घेतला आणखी एक बळी...

धक्कादायक! युवक-युवतीच्या ऑनलाईन प्रेमाचे गंभीर परिणाम...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune city crime news unit 1 arrested gangster for mobile rob
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे