पुणे शहरात धोकादायक मांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

पशुपक्ष्यांच्या आणि नागरिकांच्या जीवांच्या दृष्टीने धोकादायक ठरू पाहणाऱ्या मांजाची विक्री करणाऱ्या दोघा विक्रेत्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

पुणेः पशुपक्ष्यांच्या आणि नागरिकांच्या जीवांच्या दृष्टीने धोकादायक ठरू पाहणाऱ्या मांजाची विक्री करणाऱ्या दोघा विक्रेत्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी 50 हजार रुपये किंमतीचे 19 रीळ जप्त केले आहेत. जुनेद अकबर कोल्हापूरवाला (वय 29) आणि अदनान असिफ अली सय्यद (वय 19) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरुद्ध पर्यावरण संरक्षक कायदा नुसार फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुळशी पॅटर्न! पुणे जिल्ह्यातील खूनाचा बदला खून प्रकरणी तिघांना अटक

पोलिस आयुक्त पुणे शहर व पोलिस सह आयुक्त पुणे शहर यांनी पुणे शहरामध्ये प्लॅस्टिक, नायलॉन, सिथेंटिक मांजाचे वापरामुळे पक्षी व मनुष्यास होणा-या इजा (दुखापत) पासुन सरंक्षण व्हावे याकरिता अशाप्रकारे मांजाची विक्री करणारे दुकानदार, पतंग उडविणारे यांचेविरुध्द कठोर कारवाई करण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी यांना वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. मुख्य सचिव पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांनी त्यांचेकडील आदेश क्रंमाक - सीआरटी २०१५/सीआर-३७/टी.सी. २ दिनांक-३०/०३/२०१५ अन्वये पर्यावरण संरक्षण कायदा सन १९८६ नुसार प्लॅस्टिक, नायलॉन, सिथेंटिक मांजाने पक्षी व मनुष्यास होणा-या इजा (दुखापत) पासुन सरंक्षण व्हावे याकरिता प्लॅस्टिक, नायलॉन, सिथेटिक पासुन बनविण्यात येणारा मांजाचा वापर करण्यास, जवळ बाळगण्यास बंदी घातलेली आहे.

धमकी! 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलतोय...'

दिनांक १२/०१/२०२२ रोजी युनिट - १ गुन्हे शाखा पुणे कडील पोलिस अधिकारी व अंमलदार पुणे शहरात गस्त घालुन प्लॅस्टिक, नायलॉन, सिथेटिक पासुन बनविण्यात आलेल्या मांजाची कोठे विक्री होते अगर कसे ? यांची माहीती काढत असताना महिला पोलिस अंमलदार मिना पिंजण व रुखसाना नदाफ यांना माहितगारांकडून माहीती मिळाली की, बोहरी आळी, रविवार पेठ पुणे याभागातील एक दुकानदार चोरुन नायलॉन मांजाची विक्री करत आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी सदर दुकानात बनावट ग्राहक पाठवुन खात्री करुन छापा टाकला व दुकानातुन नॉयलॉन मांजाचे एकोणीस रिळ (बंडल) व रोख रक्कम असा एकुण ४९९६०/- रुपयाचा माल जप्त केला आहे. दुकानाचे मालक जुनेद अकबर कोल्हापुरवाला (वय - २९ रा - २४६ गणेश पेठ पुणे) व अदनान असिफअली सय्यद (वय -१९ रा - ७१५ गणेश पेठ पुणे) यांचेविरुध्द फरासखाना पोलिस स्टेशन पुणे गुरनं - ०८/२०२२ भा.दं.वि. कलम ३३६ , १८८ व पर्यावरण संरक्षण कायदा सन १९८६ चे कलम ५ १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आलेली आहे. प्लॅस्टिक, नायलॉन, सिथेंटिक मांजाचे वापराने पक्षी व मनुष्यास गंभीर स्वरुपाच्या इजा दुखापती होतात त्यामुळे अशाप्रकारे मांजाची विक्री करु नये, जवळ बाळगु नये व वापर करुन अन्यथा त्यांचेविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी कळविले आहे.

धक्कादायक! दाऊदचा भाचा सोहेल कासकर पाकिस्तानला फरार...

सदरची कामगिरी रामनाथ पोकळे अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्रीनिवास घाडगे पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरीष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, पोलिस उप निरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलिस अंमलदार अजय जाधव, अजय थोरात, अशोक माने, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे महिला पोलिस अंमलदार मिना पिंजण व रुखसाना नदाफ यांनी केली आहे.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

रांजणगाव एमआयडी पोलिस व चोरट्यांची समोरा समोर चकमक...

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune city crime news two arrested for manja sale in bohare a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे