स्वारगेटजवळ मध्यरात्री मोटारीत दोन वेळा बलात्कार; दोन तासात अटक...

स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मागदर्शनाखाली आरोपीला अवघ्या दोन तासात अटक करण्यात यश आले आहे.

पुणेः विवाहीत प्रवासी युवतीवर मध्यरात्रीच्या सुमारास मोटारीत दोन वेळा बलात्कार करुन पळणाऱ्या युवकाला स्वारगेट पोलिसांनी पाठलाग करून अवघ्या दोन तासात अटक केली आहे. स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मागदर्शनाखाली आरोपीला अवघ्या दोन तासात अटक करण्यात यश आले आहे. स्वारगेट पोलिसांच्या गेल्या काही महिन्यांपासून धडाकेबाज कारवाया सुरू आहेत.

पीएमपीएलमध्ये चोरी करणाऱया महिलांना स्वारगेट पोलिसांकडून अटक

पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती व तिचा नवरा यांनी घरातून पळून जावून एक वर्षांपुर्वी लग्न केले आहे. त्यानंतर ते दोघेजण खामगाव येथील शेगाव येथील हॉटेलमध्ये वेटरचे व इतर कामे करीत होते. दोघेजन दोन दिवसांपुर्वीच कामाच्या शोधात पुण्यात आले होते. कात्रज येथील शिवभोजन थाळी या खानावळीत शनिवारी (ता. ११) दिवसभर काम करुन रात्री उशीरा स्वारगेट स्टेशनवर चौकात झोपण्यासाठी चालत येत होते. यावेळी स्टॅन्डजवळील कॅनॉलच्या फुटपाथजवळ पार्क असलेल्या पांढऱ्या रंगाच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक आरोपी नवनाथ शिवाजी भोंग (वय ३८ वर्षे रा. सतीश मुरलीधर ढोले, महाविर शहा, सॅलीसबरी पार्क, महर्षीनगर पुणे मुळगाव - मु.पो. वडापुरी ता इंदापूर जि. पुणे) याने त्यांना थांबवेल. त्यावेळी त्यांनी ते स्टॅन्डवर झोपण्याकरीता जात असल्याचे सांगितले. आरोपीने त्या दोघांना गाडीत आराम करा ते जास्त तुमच्यासाठी सुरक्षित राहील असे सांगितले. त्यांचावर विश्वास बसल्याने ते टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये झोपले. पहाटे ०३/३० वा च्या सुमारास महिलेच्या पतीला शौचालयाला होते. यावेळी आरोपी त्यालास्वारगेट स्टॅन्डला घेवून गेला. तो स्वच्छतागृहात जाताच आरोपी त्याला तसाच सोडून पळत गाडीकडे आला.

स्वारगेट पोलिसांनी २४ तासात केली गुंडांना अटक; मुद्देमाल हस्तगत...

आरोपीने गाडी चालू करुन तो आडबाजूच्या अंधारात घेवून गेला. पीडीत महिलेला ठार मारण्याची धमकी देवून व मारहाण करुन आरोपीने तिच्यावर गाडीतच दोन वेळा बलात्कार केला. पीडित महिलेला मोटारीतून खाली उतरवून निघुन गेला. याची तक्रार दिल्याने स्वारगेट पो.स्टे. गु.र.नं. १०९/२०२२ भादवि कलम ३६३,३७६,३७६ (२)(एन), ३२३, ५०४,५०६ अन्वये, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याबाबत तपासपथकातील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन सुचना दिल्याने तपासपथकातील पोलिस अंमलदार दिपक खेंदाड, किरण भरगुडे यांनी पी.एम.पी.एम.एल.चे स्वारगेट बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पांढऱ्या रंगाच्या ट्रव्हल्सचा अर्धवट नं. ६६ हि कर्नाटक येथील पॅसेंजर भरुन कात्रजचे दिशेने गेल्याचे दिसले. त्यावरुन सरकारी गाडी घेवून सदर गाडीचा शोध घेत असताना गाडीचे ड्रायव्हरने पोलिस गाडी आल्याचे पाहुन गाडी जोरात पळवून जावू लागला. त्याचा बिबवेवाडी येथेपर्यंत पाठलाग करुन त्यास गाडी थांबविण्यास भाग पाडले. आरोपी नवनाथ शिवाजी भोंग (वय ३८, रा.मु.पो.वडापुरी ता इंदापूर जि. पुणे) हा गाडी सोडून पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले आहे.

स्वारगेट पोलिसांकडून विमानाने प्रवास करणारे 'हायटेक' सायकल चोरटे जेरबंद

सदरची कामगीरी पोलिस अंमलदार दिपक खेंदाड, किरण भरगुडे व मुकुंद तारु यांनी सागर पाटील, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-२ पुणे शहर, सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर, स्वारगेटचे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, सोमनाथ जाधव, पोलिस निरीक्षक (गुन्हे), स्वारगेट पो.स्टे, पुणे  अमोल रसाळ, सहा. पोलिस निरीक्षक, पोलिस उप-निरीक्षक तुषार भोसले, अशोक येवले, व आर. आर. पाटील यांचे मार्शदर्शनाखाली केली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास अशोक इंदलकर हे करत आहेत.

स्वारगेट पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; सलग आठ दिवस पाठलाग...

स्वारगेट पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत मुददेमाल केला हस्तगत

भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला...

चॅलेंज स्वीकारणं हे माझ्या रक्तात: अशोक इंदलकर (वरिष्ठ पोलिस निरीक्षक)

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

इतिहास पोलीस दल निर्मितीचा... (अशोक इंदलकर)

'त्या' माऊलीकडे पाहून मला खूप वाईट वाटले...

खळबळ! पुणे शहरात दिवसा ढवळ्या कोयत्याने वार करून हत्या...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune city crime news swargate police arrested for women tour
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे