लेकीचे पोलिस भरती स्वप्न! शिवाजीनगर पोलिसांनी वाहन चालकाला केली अटक...

शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे.

पुणेः लाडक्या लेकीला पोलिस व्हायचं स्वप्न असल्याने तिला पोलिस भरतीसाठी नाशिकमधून पुण्यामध्ये घेऊन आलेल्या एका वडिलांना वाहनाने उडवले होते. या अपघातात सुरेश सखाराम गवळी (वय ५३) यांचा मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली होती. शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! लाडक्या लेकीला पोलिस व्हायचं स्वप्न अन् वडिलांचा मृत्यू...

शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे दि. १३/०३/२०२० रोजी गुरन, ५८/२०२३ भा.द.वि. २७९, ३०४(अ) सह ४११९/१७७ हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयामध्ये आनोळखी कंटेनर चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाणे व निष्काळजीपणे चालवून रस्ता ओलांडणारे सरेश सखाराम गवळी (वय ५३ वर्ष, व्यवसाय रिक्षाचालक, रा. रमाबाई आंबेडकरनगर वाशिकरोड, नाशिक) यांना धडक देऊन गंभीर जखमी केले. शिवाय, त्यांच्या मृत्युस कारणीभूत झाला होता. सदरचा गुन्हा पडल्यानंतर आरोपी कंटेनर चालक हा तेथे न थांबता फरारी झाला होता. 

शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल गुन्ह्यातील अज्ञात वाहनाचा आणि वाहनचालकाचा सहा. पोलिस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे व तपास पथकातील पोलिस अंमलदार यांनी तेथील घटनास्थळावर व परिसरात सखोल तपास करून पोहवा. १०९ रणजित फडतरे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून, सातत्यपूर्ण तपास करून गुन्हयातील अनोळखी वाहनाची माहिती प्राप्त केली. त्यामध्ये सदरचा कंटेनर हा बाबा रोडवेज जालना येथील टाटा कंपनीचा कंटेनर क्र. एमएच/२९/बी.एच/३३६९ हा असून तो कंटेनर व गुन्हा करणारा चालक हा जालना येथून १६/०३/२०२३ रोजी नगररोडने वाघोली पुणे येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. 

तपास पथकातील अधिकारी सपोनि भोलेनाथ अहिवळे, पोहवा.१०९ रणजित फडतरे पोहचा. ३८६ अतुल साठे असे खाजगी वाहनाने वाघोली परिसरात रवाना झाले होते. तेथे जाऊन वाघोली वजन काट्या जवळ सापळा रचला. १६/०३/२०२३ रोजी ०२/३० वा. चे सुमारास दाखल गुन्हयातील वाहन व त्यावरील चालक वाघोली येथील वजन काटयावर आल्याचा दिसला. त्यास तपास पथकातील अधिकारी सपोनि भोलेनाथ अहिवळे व पोलिस पथक यांनी शिताफीने थांबवून ताब्यात घेतले. ताब्यातील वाहन चालकास त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अंकुश राजेंद्र राख (रा-मु. हाजीपुर पो. ब्रम्हागांव ता. आष्टी जि. बीड) असल्याचे सांगितले. तसेच त्याचे ताब्यातील कंटेनर क्र. एमएच/२१/बी.एच/३३६९ या वाहनाने १३/०३/२०२३ रोजी पहाटे ०४/१५ वा. सुमारास शिवाजीनगर पुणे येथील एच पी पेट्रोल पंप समोर रोड क्रॉस करणा-या व्यक्तीस जोरदार धडक देवून त्याचे मरणास कारणीभूत होवून अपघाताच्या ठिकाणी न थांबताच तसाच भरधाव वेगाने निघुन गेलो अशी कबुली दिली. शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे आणून दाखल गुन्हयामध्ये दि. १६/०३/२०२३ अटक करण्यात आली व सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी राजेंद्र डहाळे, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, संदीप सिंह गिल्ल पोलिस उपायुक्त परि-०१, गजानन टोम्पे, सहा. पोलिस आयुक्त विश्रामबाग विभाग यांच्या आदेशाने शिवाजीनगर पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि भोलेनाथ अहिबजे, पोलिस उप निरिक्षक अर्जुन नाईकवाडे, पोलिस उप निरिक्षक विशाल शिंदे आणि पोलिस अंमलदार रणजित फडतरे, अतुल साठे, बशीर सय्यद, शिवा कांबळे, प्रविण राजपुत, अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी यांनी केली आहे.

पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक...

पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...

'पोलिसकाका विशेषांक'

किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

 

शिवाजीनगर पोलिसांनी महिलांसोबत अश्लिल बोलणाऱयाला दिल्लीतून केली अटक...

शिवाजीनगर पोलिस स्टेशन हद्दीतील आरपी तडीपार...

शिवाजीनगर पोलिसांनी २५० सीसीटीव्ही तपासून उघड केला अपघाताचा गुन्हा...

शिवाजीनगर पोलिसांकडून अवैद्य गुटखा विक्रीवर कारवाई...

शिवाजीनगर पोलिसांनी खुनी हल्ला करणाऱयांना २४ तासात केले जेरबंद...

शिवाजीनगर पोलिसांकडून कोयता गँग जेरबंद; पाहा नावे...

शिवाजीनगर पोलिसांकडून जबरी चोरीचा गुन्हा दोन तासात उघड...​

शिवाजीनगर पोलिसांनी विविध राज्यांतून हस्तगत केले २० मोबाईल अन्...

शिवाजीनगर पोलिसांकडून जबरी चोरीचा गुन्हा उघड...

शिवाजीनगर पोलिसांनी केला वाहनचोरीचा गुन्हा २४ तासात उघड...

शिवाजीनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडून जप्त केले लाखोंचे मोबाईल...

शिवाजीनगर पोलिसांकडून वाहनचोरीचे गुन्हे उघड...

महिलेचा मोबाईल हिसकवणाऱयाला शिवाजीनगर पोलिसांनी केले जेरबंद...

शिवाजीनगर पोलिसांनी आरापीस १२ तासाच्या आत केले जेरबंद...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune city crime news shivajinagar police driver arrest for k
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे