काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटर सायकलवर बसलेला अन् कंबरेला कोयता...

दुचाकी चोरास हत्यारासह समर्थ पोलिसांनी केली अटक...

समर्थ पोलिसांनी एका दुचाकी चोरास अटक केली आहे. तपासादरम्यान त्याच्या कंबरेला कोयता आढळून आला.

पुणेः समर्थ पोलिसांनी एका दुचाकी चोरास अटक केली आहे. तपासादरम्यान त्याच्या कंबरेला कोयता आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

पुण्यातील रेकॉर्डवरील आरोपी दोन वर्षांकरीता तडीपार...

समर्थ पोलिस ठाणेकडील तपास पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप जोरे व तपास पथकातील पोलिस अमंलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. पोलिस अंमलदार हेमंत पेरणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अंगात काळया रंगाचा टी शर्ट व काळया रंगाची काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला एक जण बारणे रोड येथील भंगारचे दुकानाजवळ मंगळवार पेठ पुणे येथे दुचाकी स्प्लेंडर गाडीवर बसलेला आहे. त्याच्या जवळ कोयत्या सारखे हत्यार आहे. सदरची खबर सहाय्यक पोलिस निरीक्षक जोरे यांनी समर्थ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन योग्य ती कारवाई करण्यास सांगितले.

हॉस्पिटलमधील बाथरुममध्ये महिलेला आंघोळ करताना पाहणारा अटकेत...

घटनास्थळी दुचाकी स्प्लेंडर गाडीवर एकजण मिळून आला. त्याला नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याने पहिले उडवाउडवीची उत्तरे दिली. विश्वासात घेवून अधिक चौकशी केली. सचीन रामदास चिकटे (वय ३० वर्षे, रा. पुणे फिरस्ता, मुळ रा.मु.पोस्ट. तांदुळवाडी, तालुका आकोट जिल्हा अकोला) असे त्याचे नाव आहे. दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या डाव्या कमरेस एक लोखंडी कोयता मिळून आला. त्याच्या ताब्यातील एक काळया रंगाची स्प्लेंडर मोटर सायकल तिचे आर.टी.ओ. नंबर प्लेट वर एम. एच. १६ ए.एल.४८८१ असा नंबर असलेली तिचा चॅसिस नंबर- MBLHA10EEAHC04611 इंजिन नंबर-HA10EAAHCA3953 असा असलेली दुचाकी मिळून आली. दुचाकी व कोयता स्टाफच्या मदतीने समर्थ पोलिस स्टेशन या ठिकाणी आणले. विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता, सदरची दुचाकी ही कोरेगाव पार्क पुणे या ठिकाणाहून चोरल्याचे त्याने सांगितले. कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनचा अभिलेख पडताळला असता त्या ठिकाणी सदर वाहनाबाबत गुन्हा रजिस्टर क्र. ५७/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे दाखल असल्या समजले. सदर आरोपीवर समर्थ पोलिस स्टेशन गु.र.नं. १०२/२०२२ आर्म अॅक्ट कलम ४(२५) व महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कारवाई चालू आहे.

पालखी बंदोबस्तादरम्यान युनिट 2ने पाठलाग करून एकाला केले जेरबंद...

सदरची कामगिरी ही राजेंद्र डहाळे अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर, डॉ. प्रियंका नारनवरे, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ सतिश गोवेकर, सहाय्यक पोलिस आयुंक्त, फरासखाना विभाग, पुणे. विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, समर्थ पो.स्टे, उल्हास कदम, पोलिस निरीक्षक, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप जोरे, पोलिस हवालदार संतोष काळे, पोलिस नाईक सुभाष पिंगळे, पोलिस अंमलदार हेमंत पेरणे, श्याम सुर्यवंशी, सुभाष मोरे, विठ्ठल चोरमले यांनी केली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांचे वारीदरम्याचे अनुभव...

पुणे पोलिसांकडून पालखी सोहळयाचे प्रत्येक अपडेट 'एका क्लीकवर'

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ८४वी कारवाई

थराराक! चित्त्याच्या चपळाईने शस्त्रसज्ज आरोपीवर घेतली झेप...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune city crime news samarath police one arrested at mangalw
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे