सहकारनगर पोलिसांकडून २४ तासाच्या आत चोरटा जेरबंद...
महागडे प्लंबींगचे साहित्य व खोदकामाचे ब्रेकर चोरणा-या आरोपीस सहकारनगर पोलिसांनी २४ तासाचे आत चोरलेल्या साहित्यासह शिताफीने अटक केली आहे.पुणेः रात्रीचे वेळी महागडे प्लंबींगचे साहित्य व खोदकामाचे ब्रेकर चोरणा-या आरोपीस सहकारनगर पोलिसांनी २४ तासाचे आत चोरलेल्या साहित्यासह शिताफीने अटक केली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब नव्हे तर काय आढळले पाहा...
०९/०५/२०२२ रोजी रात्रीचे वेळी सहकारनगर पोलिस स्टेशनचे हद्दितील विवेकानंद सोसायटी संतनगर आरण्येश्वर पुणे येथील बांधकाम साईटवरुन १,०२,७५०/- रुपये किंमतीचे महागडे प्लंबीगचे साहित्य व खोदकामाचे ब्रेकर चोरीस गेले होते. सदरबाबत अतुल मालोजीराव सुर्वे (वय ५२ वर्षे, धंदा
नोकरी रा.बी/९ हर्ष विहार सोसायटी साप्रस रोड औंध पुणे) यांनी अज्ञाताविरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन सहकारनगर पोलिस स्टेशन येथे गु.र.नं.१०९/२०२२ भा.द.वी. कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगांवकर व युनुस मुलाणी पोलिस
निरीक्षक (गुन्हे) स.नगर पोलिस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी व पोलिस अंमलदार करीत होते.
रूबी हॉल क्लिनिक किडनी तस्करी प्रकरणात मोठी कारवाई
तपास पथकातील पोलिस अंमलदार भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, व महेश मंडलीक यांना बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील प्लंबीकच्या वस्तु हया आण्णाभाऊ साठे वसाहत अरण्येश्वर पुणे येथे राहणा-या सोमनाथ पवार याने चोरल्या असुन तो त्या वस्तु विकण्यासाठी गि-हाईकाचे शोधात आहे. त्यानुसार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी समीर शेंडे व तपास पथकाचे स्टाफने आण्णाभाऊ साठे वसाहत अरण्येश्वर पुणे येथे सापळा लावला. १) सोमनाथ कालीदास पवार (वय १९ वर्षे, रा.५४/२ आण्णाभाऊ साठे वसाहत अरण्येश्वर पुणे) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडून दाखल गुन्हयात चोरीस गेलेले १,०२,७५०/- रुपये किंमतीचे महागडे प्लंबीगचे साहित्य जप्त केले आहे. आरोपी सोमनाथ कालीदास पवार यास दाखल गुन्हयात अटक केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मारुती वाघमारे हे करीत आहेत.
राज्य सरकारकडून राज ठाकरे यांच्यासाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण....
सदरची कामगीरी डॉ. राजेंद्र डहाळे,अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, सागर पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-२ पुणे, सुषमा चव्हाण, सहा.पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे, सावळाराम साळगांवकर वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहकारनगर पोलिस स्टेशन पुणे, युनुस मुलाणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) स.नगर पोलिस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलिस स्टेशन येथील तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर शेंडे, पोलिस हवालदार बापू खुटवड, पोलिस अंमलदार भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, महेश मंडलिक, प्रदिप बेडीस्कर, सागर शिंदे यांनी केली आहे.
नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?
भोंगा, हनुमान चालिसापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा नाही का?
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...