हृदयद्रावक! लाडक्या लेकीला पोलिस व्हायचं स्वप्न अन् वडिलांचा मृत्यू...

लाडक्या लेकीला पोलिस व्हायचं स्वप्न असल्याने तिला पोलिस भरतीसाठी नाशिकमधून पुण्यामध्ये घेऊन आलेल्या एका वडिलांवर काळाने घाला घातला.

पुणेः लाडक्या लेकीला पोलिस व्हायचं स्वप्न असल्याने तिला पोलिस भरतीसाठी नाशिकमधून पुण्यामध्ये घेऊन आलेल्या एका वडिलांवर काळाने घाला घातला. अपघातात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरेश सखाराम गवळी (वय 55) असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

सुरेश सखाराम गवळी यांची मुलगी पोलिस भरतीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. पोलिस भरतीची तारीख कळल्यानंतर आपल्या मुलीला सुरेश गवळी आणि त्यांची पत्नी नाशिकहून पुण्याला घेऊन आले होते. पुणे शहरामध्ये रात्री उतरल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर परिसरातील फुटपाथवर मुक्काम केला. पहाटे दोनच्या दरम्यान मुलीचे ग्राउंड असल्याने मुलीला ग्राउंडवर सोडायला गेले. मुलीला रात्री ग्राउंडवर सोडल्यानंतर शिवाजीनगर परिसरातून हॉटेल प्राईडच्या दिशेने चहा पिण्यासाठी सुरेश गवळी निघाले असताना काळाने त्यांच्यावरती घाला घातला. अचानक समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने सुरेश गवळी यांना उडवले आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

लाडक्या लेकीला पोलिस व्हायचं स्वप्न बाप पाहू न शकल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहे. या घटनेसंदर्भातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे. सीसीटीव्हीचा माध्यमातून वाहनचा  शोध घेतल्यानंतर आरोपीचा शोध घेणार आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

हृदयद्रावक! म्हशीचा अचानक धक्का लागला अन्...

हृदयद्रावक! बाळाच्या पाळण्याच्या दोरीने घेतला गळफास...

हृदयद्रावक! कुटुंबातील चौघांवर अंत्यसंस्कार करताना फुटला अश्रूंचा बांध...

पुणे-नगर मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटूंबातील चौघे ठार

हृदयद्रावक! एकाच सरणावर चौघांना निरोप देताना फुटला अश्रूंचा बांध...

हृदयद्रावक! एकाच चितेवर मायलेकींवर अंत्यसंस्कार...

हृदयद्रावक! दीड महिन्यापूर्वीच झाले होते लग्न अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune city crime news one killed at shivaji nagar area police
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे