मुंढवा पोलिसांनी दुसऱ्या जिल्हयात जाऊन आरोपीला केले जेरबंद...
दहा वर्षांपासून पाहिजे असलेला घरफोडीतील आरोपीला मुंढवा पोलिसांनी दुसऱ्या जिल्हयात जाऊन जेरबंद केले आहे.पुणेः दहा वर्षांपासून पाहिजे असलेला घरफोडीतील आरोपीला मुंढवा पोलिसांनी दुसऱ्या जिल्हयात जाऊन जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुंढवा पोलिस ठाणे तपास पथकाला १४/०३/२०२३ रोजी गोपनीय बातमीदार मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, मुंढवा पोलिस ठाणे गुरनं.७६ / १३ भादविक ४५४,४५७,३८०, ३४ या गुन्हया मधील दहा वर्षांपासून पाहीजे असलेला व वेळोवेळी पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी भिमराव उर्फ भिम मारोती बोंडळवाड (वय ३८, रा. बेटमोगरा, ता. मुखेड, जि. नांदेड) हा त्याच्या मुळगावी आला आहे. सदर बातमीचे अनुशंगाने वरिष्ठांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलिस ठाणेकडील तपास पथकास नांदेड येथे रवाना करून, सदर आरोपीस स्थानिक पोलिसांचे मदतीने शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यास मा. प्रथम वर्ग न्यायाधीश, लष्कर कोर्ट यांचेकडे हजर केले असता, त्यांनी आरोपीस पोलिस कस्टडी दिली आहे. सदर आरोपीकडे कस्टडीत अधिक चौकशी चालू आहे.
सदरची कामगीरी अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ - ५, पुणे शहर, विक्रांत देशमुख, सहा. पोलिस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर, बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे, पुणे, अजित लकडे, पोलिस निरीक्षक, (गुन्हे), प्रदिप काकडे तपास पथकाचे सहा पोलिस निरीक्षक, संदिप जोरे, पोलिस अंमलदार, दिनेश राणे, दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे, सचिन पाटील व सर्वेलन्स पथकाचे हेमंत झुरंगे व दिपक कांबळे यांनी केली आहे.