मुळशी पॅटर्न! पुणे जिल्ह्यातील खूनाचा बदला खून प्रकरणी तिघांना अटक

लोणीकंदमधील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ नानासाहेब शिंदे व त्याच्या टोळक्यांनी गाडी आडवी घालून त्यांना थांबविले.

पुणे : लोणीकंद येथे टोळीयुद्धातून झालेल्या बाप-लेकाच्या हत्येप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

थरारक! पुणे जिल्ह्यात खूनाचा बदला खूनाने...

प्रतिक अनिल कंद (वय २८), नानासाहेब बाबुराव शिंदे (वय ६५) आणि आशितोष नानासाहेब शिंदे (वय ३२, सर्व रा. लोणीकंद) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. शिवाय निखिल पाटील, रुग्वेद वाळके, ऋतिक किनकर, निखिल नितीन जगताप, माऊली कोलते, अभि गव्हाणे, शुभम वागळे व इतर ४ ते ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धमकी! 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलतोय...'

गेल्या वर्षी गोल्ड मॅन सचिन नानासाहेब शिंदे याचा गोळीबार करुन खून करण्यात आला होता. त्याचा बदला घेण्यासाठी त्या खूनातील जामिनीवर सुटलेल्या सनी शिंदे व त्याचे वडिल कुमार मारुती शिंदे (वय ५०) यांच्यावर हल्ला करुन त्यांचा बुधवारी सायंकाळी निर्घुण खून करण्यात आला होता. लोणीकंद, शिक्रापूर परिसरात दोघांमध्ये वर्चस्वातून टोळीयुद्ध सुरु झाले. त्यातूनच गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२१मध्ये गोल्डमॅन सचिन नानासाहेब शिंदे  याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. याप्रकरणात सचिन किसन शिंदे याच्यासह १२ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील सनी शिंदे याच्यासह काही जणांना जामीन मिळाला. सनी शिंदे याचा भाऊ सचिन शिंदे याच्या जामिनावर बुधवारी शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी होती. त्यासाठी सनी, त्याचे वडिल कुमार, भावजयी मिनल शिंदे व चालक ज्ञानेश्वर चव्हाण हे मोटारीने पुण्यात आले होते. मात्र, जीवाच्या भितीने जामीन मिळालेले इतर पुण्यात आले नव्हते. सुनावणी झाल्यानंतर ते मोटारीने लोणीकंदला जात होते. तेव्हापासून हल्लेखोर त्यांचा पाठलाग करीत होते. 

धक्कादायक! दाऊदचा भाचा सोहेल कासकर पाकिस्तानला फरार...

लोणीकंदमधील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ नानासाहेब शिंदे व त्याच्या टोळक्यांनी गाडी आडवी घालून त्यांना थांबविले. दोन गाड्यातून आलेल्या हल्लेखोरांनी प्रथमेश ऊर्फ सनी याच्यावर कोयत्याने वार करुन व दगडाने मारून त्याचा खून केला. त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडलेले त्याचे वडिल कुमार यांच्यावरही त्यांनी वार केला. त्यात दोघांचा जागीच मृत्यु झाला. मोटारीमधील मिनल शिंदे व ज्ञानेश्वर चव्हाण यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहेत.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

रांजणगाव एमआयडी पोलिस व चोरट्यांची समोरा समोर चकमक...

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune city crime news lonikand police three arrested for doub
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे