कोयत्याचे स्टेटस ठेवणाऱयांना युनिट ६ने केले गजाआड; पाहा नावे...
सोशल मिडियावर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणाऱ्यांना गुन्हे शाखा युनिट ६ने गजाआड केले आहे.पुणेः सोशल मिडियावर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणाऱ्यांना गुन्हे शाखा युनिट ६ने गजाआड केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
सध्याच्या वाढत्या गुन्हेगारीच्या अनुषंगाने पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कडक कारवाईचा करण्याचे आदेशित केल्याने सदरबाबत गंभीर दखल घेऊन गुन्हे शाखा युनिट ६ कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल व त्याचे पोलिस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी सोशल मिडिया वर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणारे तसेच कोयता जवळ बाळगणाऱयांना सदर पथकाने ताब्यात घेऊन त्यांचेवर लोणीकाळभोर, हडपसर या पोलिस स्टेशन मधे भारताचा हत्यारबंदी कायदा अंर्तगत गुन्हे दाखल केले आहेत.
थेऊर गावचे हद्दीत तारमळा रोड येथे पेट्रोलिंग करताना
१) तेजस संजय बधे वय १९ वर्षे रा. बोडके वस्ती, थेऊर, पुणे,
२) उदय सिद्धार्थ कांबळे वय १९ रा. भिल्ल वस्ती, चिंतामणी बेकरी थेऊर ते कोलवडी रोडवर, म्हतारी आई मंदिर रोड, थेऊर, तालुका हवेली जिल्हा पुणे
३) प्रसाद उर्फ बाबू धनंजय सोनवणे वय १९ रा. ढवळे चौक समोर, सखाराम नगर, नायगाव रोड, थेऊर, तालुका हवेली जिल्हा पुणे
४) रोहित राजू जाधव वय २० वर्षे रा. महादेव मंदिर जवळ, लोणीकाळभोर, पुणे ,
५) संग्राम भगवान थोरात वय 28 वर्ष रा - कावडीपाट टोल नाका जवळ, चांदणी वस्ती, ता - हवेली पुणे
६) तसेच आणखी तीन अल्पवयीन बालक
७) हडपसर पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करताना श्याम गुरप्पा जाधव वय ४३ वर्षे रा. शेवकर वस्ती, लक्ष्मीनगर, वानवडी, पुणे यांचे ताब्यात लोखंडी पात्याचे कोयते मिळून आल्याने त्यांना पुढील तपासकामी संबंधित पोलिस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कामगिरी माननीय वरिष्ठांचे आदेशाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांचे मार्गंदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. सध्या कोयता घेऊन दहशत पसरविण्याचे प्रकार सुरु असून त्यात अल्पवयीन बालकांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे दिसून आले आहे. म्हणून याची गंभीर दखल घेऊन यापुढे अल्पवयीन बालकांवर देखील कडक कायदेशीर कारवाई पोलिस प्रशासन करणार आहे.
पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...
'पोलिसकाका विशेषांक'
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616
अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com
खडक पोलिसांनी कोयता गँग मधील आरोपींच्या आवळल्या मुसक्या...
पुणे शहरातील कोयता गँगवर कठोर कारवाई: पोलिस आयुक्त
Video: पुणे शहरात कोयता घेऊन फिरणाऱयाची पोलिसांनी काढली धिंड...
Video: कोयत्याने दहशत माजवणाऱयाच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या...
पुणे पोलिसांनी जीवाची पर्वा न करता पाठलाग करून पकडले...https://t.co/42LUDp7gg7#Pune #PunePolice #PoliceKaka pic.twitter.com/mlh03NHU64
— policekaka News (@policekaka) December 30, 2022
Video:पुणे पोलिसांनी जीवाची पर्वा न करता पाठलाग करून पकडले अन्...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.