युवक कमरेला वारंवार हात लावत होता; पोलिसांना संशय आला अन्...

सदर कामगिरीबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलिस स्टेशनचे कौतुक केले आहे.

पुणेः एक युवक कमरेला वारंवार का, हात लावत आहे ? याबाबत विचारणा केली असता तो आम्हांस उडवा-उडवीचे उत्तरे देवू लागला. तपासादरम्यान बेकायदेशीर अग्निशस्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात पार्किंगमधील 13 दुचाकी, 2 रिक्षा आगीत भस्मसात

पुणे शहरात कोराना रोगाचे रुग्ण वाढत असल्याने पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करुन कोरोना नियमांचे पालन न करणा-या व मास्क न वापरणा-या नागरिकावर कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील व पोलिस निरीक्षक (गुन्हे) गोकुळ राऊत यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तपासपथक अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे, तपास पथक अंमलदार योगेश कुंभार, गणेश चिंचकर, दिपक जडे, अमोल हिरवे, अभिजीत रत्नपारखी कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत कारवाई करत होते. खडी मशीन परिसरात पोलिस अंमलदार गणेश चिंचकर व योगेश कुंभार यांना बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, मनोज खाडे नावाचा बिबवेवाडी पोलिस ठाणे अभिलेखावरिल रेकार्डवर असणारा कुल उत्सव सोसायटीकडे जाणा-या रोडच्या कार्नरवर, कात्रज ते उंड्री हायवे रोडवर थांबलेला आहे. त्याच्या कमरेला त्याने पिस्टल बाळगलेले आहे. 

थरारक! पुणे जिल्ह्यात खूनाचा बदला खूनाने...

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी योग्य ती कारवाई करण्यात आदेशीत केले. तेव्हा सदर व्यक्ती शोध घेत असताना तो कुल उत्सव सोसायटीकडे जाणा-या रोडच्या कार्नरवर, कात्रज ते उंड्री हायवे रोडवर होता. बातमी प्रमाणे खात्री झाल्याने त्याचे हालचालींवर लक्ष्य ठेवले. काही वेळातच संशयीत व्यक्ती तेथून निघाला. त्यावेळी आम्ही त्यास सोबतचे स्टाफचे मदतीने पकडले. मनोज उर्फ सारस रमेश खाडे (वय २९ वर्षे, रा. १४४/पी, सत्यविर मित्र मंडळा जवळ, शिव दर्शन, पुणे) असे त्याने नाव सांगितले. त्याच्या कमरेच्या उजव्या बाजूला हात लावला त्यावेळी तो काहीतरी लपवत असल्याचे दिसले. कमरेला वारंवार का, हात लावत आहे ? याबाबत विचारणा करता तो आम्हांस उडवा-उडवीचे उत्तरे देवू लागला. तेंव्हा सोबत असलेल्या पंचासमक्ष त्याची अंगझडती घेता त्याचे डाव्या बाजुच्या कमरेला पॅन्टच्या आत खोचलेला एक ५०,०००/- रु देशी बनावटीचा पिस्टल व त्याच्या मॅगझीनमध्ये ३००/- रु तीन जिवंत काडतुस मिळून आले, ते जप्त करण्यात आले आहे. 

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

सदर युवकाच्या विरुध्द कोंढवा पोलिस ठाणे पुणे गुरन.३८/२०२२ भारतीय हत्यार कायदा कलम.३(२५), महाराष्ट्र पोलिस अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलिस उप आयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर व सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, अनिल सुरवसे, सहा. पोलिस निरीक्षक हे करीत आहेत. सदर कामगिरीबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलिस स्टेशनचे कौतुक केले आहे.

रांजणगाव एमआयडी पोलिस व चोरट्यांची समोरा समोर चकमक...

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune city crime news kondhwa police arrested for pistol and
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे