धक्कादायक! कोरोना आणि लॉकडाऊनने घेतला आणखी एक बळी...

अनेक ठिकाणी काम मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु काम मिळत नव्हते. याच नैराश्यातून त्यांनी रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला.

पुणेः कोरोनामुळे मागील वर्षभरापासून नोकरी नसल्याने एका बेरोजगार व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ही घटना घडली. दत्ता पुशीलकर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते जंगली महाराज रस्त्यावरील नांदे जलतरण तलाव या ठिकाणी जीवरक्षक म्हणून काम करत होते.

पुणे शहरात नागरिकांनी कारवाईची वेळ आणू देऊ नये: पोलिस आयुक्त

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुशीलकर हे केशव नगर परिसरातील कुंभारवाडा या ठिकाणी आईसह राहत होते. मागील अनेक वर्षापासून ते बालगंधर्व रंगमंदिर जवळ असलेल्या महानगरपालिकेच्या नांदे जलतरण तलावामध्ये जीवरक्षक म्हणून काम करत होते. कोरोना संसर्गामुळे 1 मार्च 2020 पासून शहरातील सर्व जलतरण तलाव बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे मार्चपासून पुशीलकर त्यांची नोकरी गेली होती. त्यांनी अनेक ठिकाणी काम मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु काम मिळत नव्हते. याच नैराश्यातून त्यांनी रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

दरम्यान, सायंकाळी घरी आलेल्या त्यांच्या आईंना पुशीलकर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुशीलकर यांना खाली उतरून रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हडपसर पोलिसांनी सापळा लावला अन् कंटेनर अलगद सापडला...

धक्कादायक! युवक-युवतीच्या ऑनलाईन प्रेमाचे गंभीर परिणाम...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune city crime news jobless youth sucide lockdown and coron
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे