बापरे! पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल 32 कोटी रुपयांची फसवणूक

वेल्थ प्लॅनेट लि. (ब्रिटन) नावाची कंपनी सुरू केली होती. ही कंपनी कमोडीटी, शेअर आणि सोने चांदी बाजाराशी संबंधित क्षेत्रात काम करत होती.

पुणे: ब्रिटनमधील एका कंपनीत गुंतवणूक केल्यास तब्बल पावणे तीनशे टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पुण्यातील एका बड्या व्यावसायिकाची तब्बल 32 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात पुण्यातील आरोपी अभियंता दाम्पत्यासह पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलाम! हुतात्मा झालेल्या मेजरची पत्नी भारतीय लष्करात

याप्रकरणी पोलिसांनी अभिजित संजय कुलकर्णी, त्याची पत्नी, अनिकेत कुलकर्णी, नितीन पाष्टे आणि आणखी एक महिला अशा पाच जणांविरोधात डेक्कन पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हेमंत गुजराथी (वय 50) असे फिर्यादी व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादी गुजराथी हे व्यावसायिक असून, चाकण परिसरात त्यांची स्वतःची कंपनी आहे. आरोपींनी फिर्यादी गुजराथी यांची ऑक्टोबर 2018 पासून फसवणूक केली असून, आतापर्यंत तब्बल 32 कोटी रुपये लाटले आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला अखेर अटक

आरोपी अभिजित कुलकर्णी आणि त्यांची पत्नी दोघेही संगणक अभियंता आहेत. त्यांनी काही काही वर्षांपूर्वी वेल्थ प्लॅनेट लि. (ब्रिटन) नावाची कंपनी सुरू केली होती. ही कंपनी कमोडीटी, शेअर आणि सोने चांदी बाजाराशी संबंधित क्षेत्रात काम करत होती. अभिजित हा या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी होता. तर पाष्टे हा एका विभागाचा प्रमुख होता.

धक्कादायक! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या; मृतदेह आणि गाडी...

एका व्यक्तीच्या माध्यमातून आरोपींनी फिर्यादी हेमंत गुजराथी यांच्याशी संपर्क साधला. यानंतर आरोपींनी फिर्यादी गुजराथी यांना ब्रिटनमधील एका कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर संबंधित कंपनीत गुंतवणूक केल्यास तब्बल 270 टक्के परतावा मिळेल असे आमिषही आरोपींनी गुजराथी यांना दाखवले होते. त्यानंतर आरोपींनी गुजराथी यांच्याकडून ऑक्टोबर 2018 पासून तब्बल 32 कोटी रुपये लाटले आहेत. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे कळताच फिर्यादी हेमंत गुजराथी यांनी डेक्कन पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास डेक्कन पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे करत आहेत.

थेट भेटः डेक्कन पोलिस स्टेशन...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune city crime news fraud of rs 32 crore by offering lucrat
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे