पुणे शहरात दिवसाढवळ्या गोळीबार; एक जण गंभीर जखमी...

पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या सनसिटी रस्ता परिसरात आज (मंगळवार) दुपारी साडेबारा वाजता गोळीबाराची घटना घडली.

पुणे: पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या सनसिटी रस्ता परिसरात आज (मंगळवार) दुपारी साडेबारा वाजता गोळीबाराची घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मोटारीतून आलेल्या हल्लेखोरांनी एकाच्या दिशेने पिस्तुलातून तीन वेळा गोळीबार केला. पोलिस तपास करत आहेत.

सनसिटी परिसरात झालेल्या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. सनसिटी सोसायटीसमोर मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेमुळे सिंहगड रस्ता परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनसिटी सोसायटीसमोर ऑटो सर्विसेसचे दुकान आहे. या दुकानाजवळ संतोष पवार नावाच्या व्यक्तीने अंगरक्षकाची पिस्तूल घेऊन त्यातून चार राउंड फायर केले. रमेश बद्रिनाथ राठोड यां गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना सिंहगड रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी घाबरून पळ काढला. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे. कल्याणीनगरमध्येही सोमवारी रात्री एका व्यावसायिकाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याबाबत येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...

'पोलिसकाका विशेषांक'

किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षांवर कुटुंबासमोरच गोळीबार...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune city crime news firing at sinhagad road suncity area on
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे