पुणे पोलिसांनी आवळल्या सराईत वाहन चोराच्या मुसक्या...

सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत वाहन चोर असून, त्याच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस होण्याची दाट शक्यता आहे.

पुणेः सराईत वाहन चोराच्या मुसक्या आवळून त्याच्याकडून ४ दुचाकी गाडया जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

राष्ट्रवादीची युवती प्रमुख कार्यकर्ती निघाली दुचाकी चोर...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहरामध्ये वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वाहन चोरांवर कारवाई करण्याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार फरासखाना पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी फरासखाना पोलिस स्टेशनकडील तपास पथकातील अभिजीत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक व तपास पथकातील पोलिस अंमलदार यांना वाहन चोरांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याबाबतच्या सुचना दिलेल्या आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये कारवाईत एका तासात 5 दहशतवादी ठार...

फरासखाना पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील प्रभारी अधिकारी अभिजीत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक हे तपास पथकातील पोलिस अंमलदारांसह वाहन चोरांचा शोध घेत होते. पोलिस अंमलदार संदीप कांबळे यांना पुणे पोलिस आयुक्तालयातील रेकॉर्डवरील आरोपी गणेश मल्लेश रायचुर (वय २५ वर्षे, रा. ५४ एच पी लोहीयानगर, फायरब्रिगेड समोर, गल्ली नंबर ५, कांबळे गल्ली, पुणे) हा चोरीची दुचाकी गाडी घेवून थांबला आहे, अशी बातमी मिळाली. फरासखाना पोलिसांनी दुधभट्टी गणेश पेठ, पुणे या ठिकाणाहुन गणेश रायचूर हा त्याचे ताब्यात अॅक्टीव्हा दुचाकी गाडी क्रमांक MH.12.KW.1836 यासह ताब्यात घेतले. सदर गाडीबाबत फरासखाना पोलिस स्टेशन गुरंनं १८५/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजल्याने त्यास नमुद गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे.

अटके दरम्यान आरोपी गणेश रायचूर याच्याकडे सहाय्यक पोलिस निरीक्षक, अभिजीत पाटील, पोलिस उप निरीक्षक अजितकुमार पाटील यांनी तपास करता त्याने आणखीन चार गाडया चोरी केल्याची कबुली दिल्याने सदरच्या गाडया आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्या गाडयांबाबत खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१)अॅक्टीव्हा दुचाकी गाडी तिचा नंबर एम.एच.१२.एन.टी.५४८८ या गाडीबाबत फरासखाना पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर १८८/२०२१ भादवि कलम ३७९
२) होंडा कंपनीची शाईन दुचाकी गाडी तिचा नंबर एम.एच.१२.के.डब्ल्यु ९०२३ या गाडीबाबत फरासखाना पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर १७३/२०२१ भादवि कलम ३७९,
३) यमाहा कंपनीची दुचाकी गाडी तिचा नंबर एम.एच.१२.बी.झेड २७६१ या दुचाकी गाडीबाबत फरासखाना पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर १८३/२०२१ भादवि कलम ३७९,
वरील प्रमाणे ४ दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असुन सदरचे दुचाकी वाहने आरोपीकडून गाडया जप्त करण्यात आली आहेत.

दुचाकीवर बसून कावऱया बावऱया नजरेने पाहताना दिसला अन्...

सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत वाहन चोर असून, त्याच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस होण्याची दाट शक्यता आहे. त्याचेकडे पुढील तपास अजितकुमार पाटील, तेजस्वी पाटील, पोलिस उप निरीक्षक हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलिस आयुक्त अभिताभ गुप्ता, पुणे शहर, डॉ. रविंद्र शिसवे, सह पोलिस आयुकत, पुणे शहर, राजेंद्र डहाळे, अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, डॉ. प्रियंका नारनवरे, मा. पोलिस उप आयुक्त परिमंडळ-१ पुणे, मा. श्री. सतिश गोवेकर साो, मा. सहाय्यक पोलिस आयुक्त फरासखाना विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलिस स्टेशन कडील राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अभिजीत पाटील सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उप निरीक्षक अजितकुमार पाटील,पोलिस अंमलदार संदीप कांबळे, समीर माळवदकर, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, सयाजी चव्हाण, वैभव स्वामी, राकेश क्षिरसागर,
ऋषीकेश दिघे, अभिजीत शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

पोलिसांनी केल्या १३ दुचाकी जप्त; चोरीची पद्धत पाहा...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune city crime news faraskhana police arrested for bike rob
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे