बांगलादेशी नागरीकांवर फरासखाना पोलिसांची कारवाई...

बांगलादेशी जोडपे बुधवार पेठ परिसरामध्ये संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फरासखाना पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे.

पुणेः बांगलादेशी जोडपे बुधवार पेठ परिसरामध्ये संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फरासखाना पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे. फरासखाना पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

फरासखाना पोलिस ठाणे गुरनं १५/२०२३ परकीय नागरीक आदेश १९४८ चा नियम क्रमांक ३(१) सह परकीय नागरीक कायदा कलम १४ व पासपोर्ट अधिनियम १९५० चे कलम ३ व ६ प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यात एक बांग्लादेशी जोडप्यामधील पुरुषास दिनांक २०/०१/२०२३ रोजी ०३.५० वा व महिला आरोपीस १३.३५ वा अटक करण्यात आलेली आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे १) ज्वेल अख्तरअली खान (वय २६ वर्ष रा. शेख बारी, गाव फुकरा, पोस्ट फुकरा, ता. काशीयानी जि.
गोपलगंज बांग्लादेश) २) मयमुना अख्तर शिउली (वय २१ वर्ष रा. सिलीपुर, पोस्ट केंदुआ, ता. केंदुआ जि. नेत्रकोना बांग्लादेश) अशी आहेत.

२०/०१/२०२३ रोजी एक बांगलादेशी जोडपे बुधवार पेठ परिसरामध्ये संशयितरीत्या फिरत असलेबाबत माहिती प्राप्त झालेवर शुक्रवार पेठ पोलिस चौकीचे अधिकारी सपोनि मनोज अभंग यांना मिळाली होती.त्यांनी वपोनि श्री शब्बीर सय्यद यांना कळविले असता त्यांनी लागलीच सदरबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सपोनि मनोज अभंग, मपोउनि किर्ती म्हस्के, पोना/३५२१ खाडे, पोशि/८२९५ सोनवणे यांनी त्यांचा शुक्रवार पेठ व बुधवार पेठ भागात पायी पेट्रोलिंग फिरून शोध घेतला असता संशयित जोडपे हे क्रांती हॉटेल चौक या ठिकाणी मिळून आले. त्यांना हटकले असता ते कावरेबावरे होवून तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना जागीच ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांना फक्त बांगला भाषा येत असल्याचे समजले. त्या भागात राहणारी व बंगाली भाषा बोलणारे महिलेस बोलावून तिचेमार्फत त्यांचेशी वार्तालाप केला असता ते त्यांनी वर नमुद प्रमाणे आपली नावे सांगितली.

दोघांकडे अधिक चौकशीकामी त्यांना पोलिस चौकी येथे आणून त्यांची दोघांची अंगझडती घेतली असता पुरुषाकडे असलेल्या खाकी पर्समध्ये महिलेचा बांग्लादेशी शाळासोडल्याचा दाखला व पुरुषाचे बांग्लदेशाचे नॅशनल आयडी कार्ड मिळून आल्याने त्याची उपस्थित बंगाली भाषेचे ज्ञान असणाऱ्या महिलेकडून खात्री करून घेण्यात आलेली आहे. सदरचे जोडपे हे बांग्लादेशी नागरीक असल्याचे निष्पणा झाले असून, सदर जोडप्याकडे पासपोर्ट किंवा इतर कोणत्याही प्रकारची वैध
कागदपत्रे नसल्याने सदरबाबत पोहवा/नारायण चलसाणी, फरासखाना पोलिस ठाणे, पुणे यांनी फिर्याद दिलेली आहे. आरोपींना प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी, न्यायालय क्रमांक-२, शिवाजीनगर, पुणे येथे हजर केले असता सदर आरोपींना  २२/०१/२०२३ रोजीपर्यंत पोलिस कस्टडी रिमांड दिलेली आहे. पुढील तपास सपोनि मनोज अभंग, फरासखाना पोलिस ठाणे, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, संदिप कर्णिक, पोलिस सह आयुक्त, पुणे शहर, राजेंद्र डहाळे, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, संदिप सिंह गिल्ल, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ- १, पुणे शहर सतिश गोवेकर, सहाय्यक पोलिस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनखाली  शब्बीर सय्यद, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, फरासखाना पोलिस ठाणे, पुणे शहर सपोनि श्री मनोज अभंग, मपोउनि श्रीमती किर्ती म्हस्के, पोहवा/ नारायण चलसाणी, पोना/सचिन खाडे, पोशि/सोनवणे यांनी केलेली आहे.

पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...

'पोलिसकाका विशेषांक'

किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठ पासून २०० सीसीटीव्ही फुटेज तपासले अन्...

फरासखाना पोलिसांनी कोंबडी पुलाजवळून दोघांना घेतले ताब्यात अन्...

फरासखाना पोलिस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा; पाहा १३ जणांची नावे...

फरासखाना पोलिसांनी धडाकेबाज कारवाई; लाखो रुपयांचा ऐवज जप्त...

फरासखाना पोलिसांनी धडाकेबाज कारवाई; लाखो रुपयांचा ऐवज जप्त...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune city crime news faraskhana police arrest bangladeshi fo
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे