बाल लैगिंक अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी...

डेक्कन पोलिस ठाणे कडील बाल लैगिंक अत्याचार कायदा (POCSO) मधील आरोपीस न्यायालाने २० वर्षे सक्तमजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

पुणेः डेक्कन पोलिस ठाणे कडील बाल लैगिंक अत्याचार कायदा (POCSO) मधील आरोपीस न्यायालाने २० वर्षे सक्तमजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

२६/०१/२०१६ रोजी दाखल गुन्हयातील पीडित मुलीस आरोपी राकेश हिरामन चव्हाण (वय-२४ वर्षे, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, पुणे) याने दिनांक २५/०१/२०१६ रोजी लग्नाचे अमिष दाखवून एरंडवणा माध्यमिक शाळा, नळस्टॉप चौक पुणे येथून पळवून नेऊन गोसावी वस्ती येथील स्मृतीबन डोंगरावर पीडित मुलीच्या मनाचे विरुध्द जावून जबरदस्तीने शरीर संबध केले असल्याने पीडित मुलीची आईने दिलेल्या तक्रारीवरुन डेक्कन पोलिस ठाणे गुन्हा रजि. नंबर २७/२०१६ भादंवि कलम ३६३, ३७६(आय), लैगिंक अत्याचारापासुन बालकाचे संरक्षण कायदा २०१२ चे कलम ३ व ४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दाखल गुन्हयाचा तपास डेक्कन पोलिस ठाणे कडील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक, शिल्पा लंबे, (सध्या- सहा. पोलिस निरीक्षक नेमणुक- विशेष शाखा, पुणे शहर) त्यांचे दफ्तरी पो. हवा. ४३७४ जाधव, (सध्या- सहा. पोलिस फौजदार नेमणुक- पिंपरी चिंचवड आयुक्तालय) पोलिस नाईक ६०९६ नलिनी क्षिरसागर (सध्या नेमणूक- वाहतुक शाखा, पुणे शहर) यांनी मिळुन गुन्हयाचा तपास पुर्ण करुन दाखल गुन्हयातील आरोपी विरुद्ध भरपुर व सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने त्याचे विरुद्ध न्यायालयात २१/०४/२०१६ रोजी दोषारोप पत्र पाठविण्यात आले होते.

धक्कादायक! पुण्यात फेसबुक लाईव्ह करत वेटरची आत्महत्या...

धक्कादायक! तथाकथित महाराजाच्या मठावर टाकला छापा अन्...

विशेष न्यायाधिश सत्र न्यायालय, शिवाजीनगर पुणे यांनी सदरची केस बोर्डवर घेवुन सदर केसची सुनावणी सुरु करुन दाखल गुन्हयातील फिर्यादी, पीडित मुलगी, पंच, साक्षीदार, डॉक्टर व इतर तज्ञ साक्षीदार यांची जबाणी नोंद करुन व दाखल गुन्हयातील तपासामधील उपलब्ध कागदोपत्री पुराव्याची खातरजमा करुन अति. सत्र न्यायाधीश श्री. बी.पी. क्षिरसागर सो. शिवाजीनगर न्यायालय, पुणे यांनी स्पेशल चाईल्ड प्रोटेक्शन केस नंबर १३४/२०१६ व गुन्हा रजि. नंबर २७/२०१६ मधील आरोपी राकेश हिरामन चव्हाण यास फौजदारी प्रक्रीया संहिता कलम २३५(२) प्रमाणे दोषी ठरविले असुन खालील प्रमाणे शिक्षा देण्यात आली आहे.
१) भादंवि कलम ३६३ मध्ये ३ वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ७ दिवस सक्तमजुरी.
२) भादंवि कलम ३७६ मध्ये ७ वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ७ दिवस सक्तमजुरी.
३) बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४ मध्ये १० वर्षे सक्त मजुरी व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास
७ दिवस सक्तमजुरी.
४) बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ६ मध्ये २० वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ७ दिवस सक्तमजुरी.

दाखल गुन्हयाची न्यायालयात सुनावणी दरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुरलीधर करपे यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी सहा. पोलिस फौजदार एस. डी. राक्षे व पोलिस हवालदार ८०० डी. वाय. गायकवाड यांनी दाखल गुन्हयातील फिर्यादी, पिडीत मुलगी, पंच, साक्षीदार, डॉक्टर व इतर तज्ञ साक्षीदार यांना तसेच गुन्हयात वेळोवेळी लागणारा दाखल गुन्हयातील जप्त वस्तुजन्य पुरावा न्यायालया समक्ष सादर केला. त्याअनुषंगाने न्यायालयाने यातील आरोपीस जास्तीत जास्त कडक शिक्षा सुनावली आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune city crime news deccan police pocso case and court pris
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे