डेक्कन पोलिसांनी वाहन चोरी गुन्ह्यातील आरोपीस केली अटक...

वाहन चोरी गुन्हयातील आरोपीस अटक करुन गुन्हा उघडकीस आणण्यात डेक्कन पोलिसांना यश आले आहे.

पुणेः वाहन चोरी गुन्हयातील आरोपीस अटक करुन गुन्हा उघडकीस आणण्यात डेक्कन पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

डेक्कन पोलिस स्टेशन येथे १८/०९/२०२२ रोजी फिर्यादी स्वपनील बंडु पार्डे (रा. गणेश बॉईज हॉस्टेल, अभिनव कॉलेज जवळ, आंबेगाव, पुणे) याने त्याच्याकडील एक होंडा स्पेलंडर मोटार सायकल नंबर MH-45AR6047 किंमत रुपये ८०,०००/- रु ही भोसले शिंदे आर्केड समोर जंगली महाराज रोड, पुणे येथे पार्क करुन ठेवली होती. पण, चोरी झाली होती. डेक्कन पोलिस ठाणे गुन्हा रजि नंबर १२६/२०२२ भादवि कलम ३७९ हा गुन्हा दाखल झाला आहे.

सदर दाखल गुन्हयाचा तपास सुरु असताना डेक्कन पोलिस ठाणे तपास पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, विनय बडगे यांना दाखल गुन्हयाबावत सीसीटीव्ही फुटेज चेक करणे बबात आदेशित केले. घटनास्थळावरील तांत्रीक पुरावा प्राप्ता करुन सदर पुराव्याचा मागोवा घेतला तसेच गुप्त बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त करुन वाहन चोरुन नेणाऱयाबाबत अधिक तपास केला असता त्याचे नाव व पत्ता उत्तम अनंत काटकर (वय ५९ वर्ष, रा. मार्डी ता. माण जि. सातारा) असा प्राप्त करुन त्या पत्यावर समक्ष जावून त्याचा शोध घेतला असता, तो मिळून आल्याने त्यास डेक्कन पोलिस ठाणे पुणे शहर येथे आणले. गुन्ह्याबाबत सखोल तपास करता नमुद आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून एक होंडा स्पेलंडर मोटार सायकल नंबर MH-45 AR6047 किंमत रुपये ८०,०००/-रु ही हस्तगत करुन जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीने अशा प्रकारे चोरी केलेल्या वाहनांबाबत तपास करुन आणखी वाहने हस्तगत करण्याची तजवीज आहे. आरोपीस न्यायालयासमक्ष हजर पोलिस कस्टडी रिमांड रिपोर्टासह हजर करीत आहोत. दाखल गुन्हयाचा तपास पो.उप-निरीक्षक संदिप जाधव डेक्कन पोलिस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कामगिरी राजद्रे डहाळे, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, डॉ. प्रियांका नारनवरे, पोलिस उप-आयुक्त परिमंडळ १ पुणे शहर, रमाकांत माने, सहा. पोलिस आयुक्त, विश्रामबाग विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांचे अधिपत्याखाली, तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक कल्याणी पाडोळे, पोलिस उप निरीक्षक संदीप जाधव, सपोफौ दत्तात्रय शिंदे, पोहवा बोरसे, पोहवा गभाले, मपोहवा सुपेकर, पोलिस अंमलदार विनय बडगे यांनी कौशल्याने तपास केला आहे.

डेक्कन पोलिसांनी झेड ब्रिजखाली नदी पात्रात लावला सापळा अन्...

डेक्कन पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार तडीपार...

थेट भेटः डेक्कन पोलिस स्टेशन...

डेक्कन पोलिसांनी शिताफीने सापळा लावून ताब्यात घेतले अन्...

डेक्कन पोलिसांकडून घरफोडी करणारा अटकेत...

डेक्कन पोलिसांना एक व्यक्ती बुलेट वरुन जाताना दिसली अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune city crime news deccan police one arrest for bike robbe
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे