पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ९५वी कारवाई...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

पुणेः विमानतळ पोलिस स्टेशनकडून संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणारा आरोपी जितेंद्र अशोक भोसले (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील त्याचा एक साथीदार यांचे गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई केली आहे.

विमानतळ पोलिस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हे करणारे गुन्हेगार जितेंद्र अशोक भोसले (वय ३८, रा. सनं. २३०, बंगाला नं. ३, गंगा निबुला सोसायटी जवळ, विमाननगर, पुणे, टोळी प्रमुख) व त्याचा साथीदार सतिश एकनाथ कोल्हे (वय ३८, रा. जयप्रकाशनगर, येरवडा, पुणे) याच्यावर विमानतळ पोलिस स्टेशन गु.र. नं. ३३१ / २०२२ भादंविक ३८४, ३४ अन्वये खंडणीचा गुन्हा दाखल आहे. सदरचा गुन्हा हा यातील संघटीत गुन्हेगारी टोळीचा प्रमुख व त्याचा इतर एक साथीदार यांनी आपल्या संघटीत गुन्हेगारी टोळीचे सदर भागात वर्चस्व अबाधित राखण्याच्या तसेच प्रभुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेला आहे. यातील आरोपी जितेंद्र अशोक भोसले (रा. सनं. २३०, बंगाला नं. ३, गंगा निबुला सोसायटी जवळ, विमाननगर, पुणे) हा मुख्य ( टोळी प्रमुख) आहे. त्याने त्याचा साथीदार सतिश एकनाथ कोल्हे (रा. जयप्रकाशनगर, येरवडा, पुणे) याच्यासह विमानतळ पोलिस स्टेशन परिसर या भागात बेकायदेशीरित्या खंडणी मागणे, खंडणी गोळा करणे, बेकायदा जमाव जमवून, मारहाण व दुखापत करणे, मालमत्ताचे नुकसान करून, जीवे ठार मारण्याची धमकी देणे असे गुन्हे दाखल आहेत.

आरोपी जितेंद्र अशोक भोसल याने त्याचा साथीदार सतिश एकनाथ कोल्हे याच्यासह स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी, विमानतळ पोलिस स्टेशन परीसरात दहशत असून, खूनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, खंडणी मागणे अशा प्रकारचे स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत. यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी प्रस्तुत गुन्हा केलेला आल्याचे दिसून आले आहे. शिवाय, वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा धजावत नसल्याने,तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२) व ३ (४) चा अंतर्भाव करणेकामी विमानतळ पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी रोहीदास पवार, पोलिस उप-आयुक्त,परिमंडळ-४, पुणे शहर यांचे मार्फतीने नामदेव चव्हाण, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग,पुणे यांना सादर केलेला होता.

सदर प्रकरणाची छाननी करून आरोपीं विरूध्द विमानतळ पोलिस स्टेशन गु.र.नं. ३३१/ २०२२, भादंविक ३८४, ३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२) व ३ (४) अंतर्भाव करण्याची नामदेव चव्हाण, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे यांनी मान्यता दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास किशोर जाधव, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगीरी ही पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सह आयुक्त संदिप कर्णिक नामदेव चव्हाण, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक
विभाग, पुणे शहर, रोहीदास पवार, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ - ४, पुणे शहर, किशोर जाधव, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, पोलिस निरीक्षक (गुन्हे), मंगेश जगताप यांनी केली आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली सन २०२२ या चालू वर्षातील ३२वी व एकूण ९५वी कारवाई आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रुग्णवाहिकेला दिला रस्ता मोकळा करून...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ९३वी कारवाई...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य: पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ७६वी कारवाई

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ९२वी कारवाई...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ९१वी कारवाई...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ९०वी कारवाई...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ८९वी कारवाई...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ८८वी कारवाई...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ८७वी कारवाई...

ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ७१वी स्थानबध्दतेची कारवाई

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune city crime news cp amitabh gupta action 95 mcoca case a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे