पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ८५वी कारवाई...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष आहे.

पुणेः विमानतळ पोलिस स्टेशनकडून संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणारा आरोपी टोळी प्रमुख रोहन अशोक गायकवाड (वय २५, व त्याचे इतर आठ साथीदारांवर गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ८४वी कारवाई

विमानतळ पोलिस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हे करणारे गुन्हेगार रोहन अशोक गायकवाड (वय २५ वर्ष, रा.स.नं. २४७, फलके चौका जवळ, कलवड वस्ती, लोहगाव, पुणे, टोळी प्रमुख) व त्याचे इतर आठ साथीदार यांच्यावर शरीराविरुध्द व मालाविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी रोहन अशोक गायकवाड हा मुख्य (टोळी प्रमुख) असून त्याने इतर आठ साथीदारांसह विमानतळ पोलिस स्टेशन परिसर या भागात शरीरा विरुध्दचे व माला विरुध्दचे गुन्हे दाखल आहेत. स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी, विमानतळ पोलिस स्टेशन, येरवडा पोलिस स्टेशन, चंदननगर
पोलिस स्टेशनपरीसरात दहशत आहे. खूनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत. आरोपी यांचेविरूध्द विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. १७५/२०२२, भादंविक ३०७, ३२४,५०४,५०६, १४३, १४७, १४८, १४९, महा.पो.का.क.३७ (१ ) १३५, आर्म अॅक्ट ४ ( २५ ), क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट क. ७ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुणे पोलिस आयुक्तांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई

आरोपींनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी प्रस्तुत गुन्हा केलेला आल्याचे दिसून आलेने व वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा धजावत नसल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२) व ३(४) चा अंतर्भाव करणेकामी विमानतळ पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी रोहीदास पवार, पोलिस उप- आयुक्त, परिमंडळ-४, पुणे शहर यांचे मार्फतीने नामदेव चव्हाण, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे यांना सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करून आरोपींविरूध्द विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. १७५/२०२२ भादंविक ३०७,३२४,५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९, महा.पो.का.क. ३७ (१)१३५, आर्म अॅक्ट ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट क. ७ (१) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१)(ii).३(२) व ३ (४) अंतर्भाव करण्याची नामदेव चव्हाण, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे यांनी मान्यता दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास किशोर जाधव, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर हे करीत आहेत.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून मोक्का अंतर्गत ८२वी कारवाई...

सदरची कामगीरी ही पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सह आयुक्त पुणे शहर, संदिप कर्णिक, नामदेव चव्हाण, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रोहीदास पवार, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ - ४, पुणे शहर, किशोर जाधव, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भरत जाधव, पोलिस निरीक्षक, (गुन्हे), मंगेश जगताप यांनी केली आहे. 

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ८१वी कारवाई...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली सन २०२२ या चालू वर्षातील २२वी व एकूण ८५वी कारवाई आहे.

ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक क

Title: pune city crime news cp amitabh gupta action 85 mocca case a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे