पोलिसांना पाहिल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला पण...

तपासा दरम्यान मयताचे मित्र व नातेवाईक व घटनास्थळाचे अजुबाजुचे प्राप्त अस्पष्ट फुटेज व बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीतील वर्णनाचा इसम हा तोच असल्याचा संशय बळावला.

पुणेः खुनाच्या गुन्हयातील आरोपीस बिबवेवाडी पोलिसांनी कोणताही धागादोरा नसतानाही तासाभरात जेरबंद केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस घराजवळ दबा धरून बसले अन् काही वेळातच...

सोमवारी (ता. १०) दुपारी ०१/३० वा पोलिस नियंत्रण कक्ष पुणे शहर येथुन खबर प्राप्त झाली की, आम्रपाली पेट्रोलपंपाजवळ, महेश सोसायटी चौक राजीव गांधी कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे, पार्किंगमध्ये एक बॉडी पडली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे व तपास पथकाचे प्रभारी अधिकारी प्रविण काळुखे, व स्टाफ असे घटनास्थळी गेले असता त्यांना एक निळी जीन्स पॅन्ट, काळे निळे रंगाचे जर्किग घातलेला पुरुष हा रक्ताचे थारोळ्यात बेशुध्द पडलेला दिसला. त्याला पुढील उपचारासाठी ससुनू हॉस्पीटल येथे नेले असता डॉक्टरांनी त्यास तपासणी पुर्वी मयत घोषित केले.

युवक कमरेला वारंवार हात लावत होता; पोलिसांना संशय आला अन्...

मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता मयताचे नाव विशाल ओव्हाळ (वय २६ वर्षे, रा. पद्मावती वसाहत, पद्मावती, पुणे) असल्याचे समजले. त्याचे काका गणेश विठ्ठल ओव्हाळ (वय ४६ वर्षे, रा. शंकर महाराज वसाहत, बौध्द विहार समोर, धनकवडी, पुणे) यांनी त्यांच्या पुतण्यास कोणीतरी अज्ञाताने राजीव गांधी कॉम्प्लेक्सचे बंद असलेल्या पार्कीगमध्ये, महेश सोसायटी चौक, बिबवेवाडी, पुणे या ठिकाणी त्याचे डोक्यात कशाने तरी प्रहार करुन त्याचा खून केला असलेबाबत तक्रार दिली. दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे करीता प्रथम मयताचे नातेवाईक, मित्र यांच्याकडे चौकशी केली असता काहीएक उपयुक्त माहिती मिळत नव्हती व मयत हा मोबाईल फोन वापरत नसल्याने त्यास कोणी कोणी फोन केले किंवा त्याने कोणा कोणास फोन केले आहे. याबाबत माहिती प्राप्त न झाल्याने आरोपीचा शोध घेणे कठीण झाले होते. पोलिस हवालदार पाटील, पोलिस हवालदार दुधाने, पोलिस नाईक शेडगे यांनी सदर ठिकाणचे दिवसा व रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्याची पडताळणी केली. रात्रीच्या फुटेजमध्ये अस्पष्ट दिसत असल्याने कोणतीही खात्रीशीर माहिती व आरोपी बाबत कोणताही धागा दोरा प्राप्त झाला नाही.

पुणे शहरात पार्किंगमधील 13 दुचाकी, 2 रिक्षा आगीत भस्मसात

तपास पथकाचे प्रभारी सपोनि प्रविण काळुखे, पोलिस हवालदार संतोष पाटील, पोलिस हवालदार शाम लोहमकर, पोलिस हवालदार गणेश दुधाने, पोलिस शिपाई शिवाजी येवले, पोलिस शिपाई सचिन फुंदे यांनी मयताचे नातेवाई, सी.सी.टी.व्ही. फुटेज चे आधारे पोलिस ठाणे हद्दीत परहद्दीत अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना सपोनि श्री. काळुखे यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, दाखल गुन्हा हा शिवदत्त ऊर्फ डि सकट (रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी, पुणे) याने केला असून, तो त्याचे मुळ गावी म्हाडा (सोलापूर) येथे जाणेचे तयारीत आहे. त्याने अंगावर गुलाबी रंगाचा फुल बाहीचा शर्ट व निळे रंगाची जिन्स् घातली असून तो रंगाने काळा सावळा व उंच तसेच सडपातळ आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली.

थरारक! पुणे जिल्ह्यात खूनाचा बदला खूनाने...

सदरची माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक, बिबवेवाडी पोलिस ठाणे, पुणे यांना कळवून त्यांचे मार्गदर्शना प्रमाणे अप्पर ओटा, ओसवाल दवाखाण्यासमोर आलो असता मिळालेले बातमीतील वर्णनाचा इसम हा गॅस गोडाऊनचे दिशेने पायी चालत जात असताना दिसला. तो आम्हास पाहून पळून जाणेचा प्रयत्न करु लागल्याने त्याचा पाठलाग करुन त्यास थोड्याच अंतरावर पकडले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव शिवदत्त ऊर्फ डि ऊर्फ दत्तात्रय चंद्रकांत सकट (वय ३४ वर्षे, रा. ए/४२/१२, अप्पर ओटा नं. २७६, शाम सुपर मार्केट जवळ, बिबवेवाडी, पुणे) असे असलेचे सांगितले. त्यास ताब्यात घेवून बिबवेवाडी पोलिस ठाणे येथे घेवून येवून त्याचेकडे उपरोक्त दाखल गुन्ह्याबाबत तपास करता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. परंतु, तपासा दरम्यान मयताचे मित्र व नातेवाईक व घटनास्थळाचे अजुबाजुचे प्राप्त अस्पष्ट फुटेज व बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीतील वर्णनाचा इसम हा तोच असल्याचा संशय बळावल्याने त्याचेकडे कौशल्यपुर्वक तपास करता त्याने दाखल गुन्हा केलेची कबुली दिली. त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गुन्हे, अनिता हिवरकर या करीत आहेत.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उप आयुक्त, नम्रता पाटील, सहा.पोलिस आयुक्त, राजेंद्र गलांडे यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे, पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या सुचने नुसार तपास पथकाचे प्रभारी सपोनि प्रविण काळुखे, पोलिस हवालदार संतोष पाटील, पोलिस हवालदार शाम लोहमकर, पोलिस हवालदार गणेश दुधाने, पोलिस नाईक दैवत शेडगे,पोलिस शिपाई शिवाजी येवले, पोलिस शिपाई सचिन फुंदे यांनी केली आहे. 

रांजणगाव एमआयडी पोलिस व चोरट्यांची समोरा समोर चकमक...

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune city crime news bibwewadi police one arrested for murde
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे