बिबवेवाडी पोलिसांनी १००पेक्षा जास्त घरफोडी करणाऱयास केली अटक...

बिबवेवाडी पोलिसांनी १०० पेक्षा जास्त घरफोडी करणाऱया अट्टल गुन्हेगारास ७२ तासाचे आत जेरबंद केले आहे.

पुणेः बिबवेवाडी पोलिसांनी १०० पेक्षा जास्त घरफोडी करणाऱया अट्टल गुन्हेगारास ७२ तासाचे आत जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास करत आहेत.

बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे हद्दीत ०९/०९/२०२२ रोजी दुपारी ०१.०० वा. ते दिनांक ११/०९/२०२२ रोजी रात्री ११.०० वा.चे दरम्यान फिर्यादी हे त्यांचा फ्लॅट नं. ११, तन्मय सोसायटी, तिसरा मजला आण्णा भाऊ साठे पुतळयामागे, बिबवेवाडी पुणे. हा कुलूप बंद करून गावी गेले होते. यावेळी चोरटयाने फिर्यादी यांचे फ्लॅटचे दरवाजाचा कोयंडा कशाचेतरी साहयाने तोडून घरात प्रवेश करून बेडरूम मधील कबर्ड मध्ये असलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच त्याप्रमाणे रम्यनगरी सोसायटी बिबवेवाडी पुणे येथील फिर्यादी यांचे सुध्दा वरील प्रमाणे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झालेनंतर वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलिस स्टेशन तपासपथक अधिकारी सपोनि काळुखे व पथक यांनी तपास सुरू करून घटनास्थळावरील व इतर ठिकाणचे असे एकूण ९० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीने गुन्हा करतेवेळी वापरलेल्या कारचा नंबर प्राप्त करून त्याचा नाव पत्ता प्राप्त केला. महाराष्ट्र व कर्नाटक पोलिस चे रेकॉर्डवरील सराईत अट्टल दिवसा घरफोडी करणारा गुन्हेगार लोकेश रावसाहेब सुतार (वय २८ वर्षे रा. मु.पो.लिंगनुर, ता.मिरज, जि.सांगली) याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यास बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण करून सांगली येथून सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. 

तपासी अधिकारी सपोनि प्रविण काळुखे व स्टाफ यांनी सखोल व कौशल्यपुर्ण तपास करून त्यांचेकडून बिबवेवाडी पोलिस स्टेशनकडील एकूण ०२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यांचेकडून दाखल गुन्हयातील चोरीस गेलेले ३,००,०००/- रुपये किमंतीचे ०६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व १०,००,०००/-कि.ची गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक सिल्व्हर रंगाची होंडा डब्लूआरव्ही कार क्रमांक MH.10.DG.6774, स्क्रू ड्रायव्हर, कपडे असे एकूण १३,००,१५०- कि रू चा ऐवज हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

सदर कारवाई ही अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, पोलिस उप आयुक्त नम्रता पाटील, परिमंडळ ५ पुणे शहर व सहा. पोलिस आयुक्त पोर्णिमा तावरे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर, तपासपथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलिस अमंलदार अभिषेक धुमाळ, तानाजी सागर, शिवाजी येवले, सतिश मोरे, संतोष जाधव, अतुल महांगडे, व पंचशिला गायकवाड यांनी केली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक, प्रविण काळुखे हे करीत आहेत.

बिबवेवाडी पोलिस स्टेशनकडील रेकॉर्डवरील आरोपी दोन वर्षांसाठी तडीपार...

बिबवेवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ६० तोळे दागिने जप्त...

बिबवेवाडी पोलिस स्टेशनकडील रेकॉर्डवरील आरोपी तडीपार...

बिबवेवाडी पोलिसांनी सायबर चोरट्यास हरियाणामधून केली अटक...

बिबवेवाडी पोलिसांनी फरार आरोपीस केले जेरबंद अन्...

बिबवेवाडी पोलिसांकडून लाखो रुपयांची फसवणूक करणारे दोघे अटकेत

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune city crime news bibwewadi police one arrest for robbery
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे