पोलिस घराजवळ दबा धरून बसले अन् काही वेळातच...

खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे.

पुणेः खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. याबाबात पोलिस पुढील तपास करत आहेत.

युवक कमरेला वारंवार हात लावत होता; पोलिसांना संशय आला अन्...

बिबवेवाडी पोलिस स्टेशन गु.र.नं. १०९/२०२१ भा.दं.वि. कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, महा. पोलिस कायदा कलम ३७(१) सह १३५, आर्म अॅक्ट कलम ४ सह २५ मधील पाहिजे आरोपी वाक्या ऊर्फ प्रसाद संभाजी आयवळे (वय २५ वर्षे, रा. बिबवेवाडी ओटा नं. २२५, दत्त मंदिरा मागे, बिबवेवाडी, पुणे) हा त्याच्या लहान बहिणींना भेटणे साठी त्याचे राहते घरी बिबवेवाडी येथे येणार असल्याबाबत पोलिस ठाणेचे तपासपथकाचे अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे यांना खात्रीशिर माहिती मिळाली होती. सदरची माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक, बिबवेवाडी पोलिस ठाणे, पुणे यांना कळवून वरीष्ठांचे आदेशान्वये मिळालेले माहिती प्रमाणे पुढील कार्यवाही करणे कामी ते स्वत: पोलिस हवालदार २३६४, लोहोमकर व पोलिस अंमलदार ८६०१, येवले असे बिबवेवाडी ओटा येथे जावून प्राप्त माहिती प्रमाणे पाहिजे आरोपीच्या राहते घराजवळ दबा धरुन थांबले. आरोपी वाक्या ऊर्फ प्रसाद आयवळे हा पायी चालत त्याचे राहते घराचे दिशेने येत असताना दिसला. पोलिसांनी घराजवळ येताच त्यास घेराव घालून जागीच शिताफीने पकडले. सपोनि प्रविण काळुखे यांनी त्यास सोबतच्या स्टाफचे मदतीने ताब्यात घेतले.

पुणे शहरात पार्किंगमधील 13 दुचाकी, 2 रिक्षा आगीत भस्मसात

बिबवेवाडी पोलिस ठाणे येथे आणून त्याच्याकडे उपरोक्त दाखल गुन्ह्याबाबत तपास करता त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक, गुन्हे अनिता हिवरकर करीत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे व पोलिस निरीक्षक, गुन्हे श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शना खाली तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलिस हवालदार २३६४ लोहमकर व पोलिस अंमलदार ८६०१ येवले यांनी केली आहे.

थरारक! पुणे जिल्ह्यात खूनाचा बदला खूनाने...

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

रांजणगाव एमआयडी पोलिस व चोरट्यांची समोरा समोर चकमक...

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune city crime news bibwewadi police arrested for murder ca
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे