लॉकडाऊनमध्ये कामधंदा नव्हता अन् पत्नीचे बाळंतपण झाले...

एकूण ०४ गुन्हे उघडकीस आले असून चार दुचाकी वाहनासह एकुण १,०५०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पुणेः बिबवेवाडी तपास पथकाने दुचाकी चोरास अटक करून दुचाकी चोरीचे ०४ गुन्हे उघड केले आहेत. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. लॉक डाऊन मध्ये कामधंदा नव्हता त्या दरम्यान पत्नीचे बाळंतपण झाले तिचे पुढील उपचारासाठी पैशाची गरज होती त्यामुळे सदरचे गुन्हे केल्याचे आरोपीने सांगीतले.

पुण्यातील व्यापाऱयाला लातूरमध्ये लुटले; पण १२ तासातच...

रविवारी (ता. २१) दुपारी दोनच्या सुमारास तपास पथक प्रभारी सपोनि उसगांवकर हे त्यांचे स्टाफसह खाजगी दुचाकीने पेट्रोलिंग करीत होते. अप्पर बस डेपो येथे पोलिस अंमलदार तानाजी सागर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक संशयीत व्यक्ती त्याचेकडील एका पांढ-या रंगाचे होंडा अॅक्टीव्हा गाडी (क्र.एम.एच.१२.क्यु.एस.७०७२) हा गाडीवर संशयीतरित्या डॉल्फीन चौक, अप्पर बिबवेवाडी येथे थांबल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. सपोनि उसगांवकर लागलीच वरील सर्व स्टाफसह डॉल्फीन चौकाचे दिशने जावून बातमीदाराने एका पांढ-या रंगाचे होंडा अॅक्टीव्हा गाडी (क्र.एम.एच.१२.क्यु.एस.७०७२) हिचेवर एक व्यक्ती संशयीतरित्या थांबल्याचे निर्देशीत केले. त्याच्याजवळ जाताचा संशयीत व्यक्ती आम्हास पाहुन अचानक त्याचेकडील गाडी चालु करुन पळून जाऊ लागला. त्यास त्याच ठिकाणी पकडून गाडीसह त्याब्यात घेतले. अकबर हुसेन शेख (वय २७ वर्षे, रा. मु.पो. साखर, ग्रामपंचायतीजवळ, ता.वेल्हा, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याला ताब्यात घेवून अटक करुन अधिक तपास करता खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.

धक्कादायक! पुण्यात फेसबुक लाईव्ह करत वेटरची आत्महत्या...

बाल लैगिंक अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी...

१. बिबवेवाडी पोलिस स्टेशन गुन्हा रजि.नं.१९४/२०२१ भा.दं.वि.कलम ३७९
२. बिबवेवाडी पोलिस स्टेशन गुन्हा रजि.नं.२०७/२०२१ भा.दं.वि.कलम ३७९
३. सहकारनगर पोलिस स्टेशन गुन्हा रजि.नं.१५१/२०२१ भा.दं.वि.कलम ३७९.
४. कोरेगाव पोलिस स्टेशन गुन्हा रजि.नं.१३६/२०२१ भा.दं.वि.कलम ३७९
एकूण ०४ गुन्हे उघडकीस आले असून चार दुचाकी वाहनासह एकुण १,०५०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलिस हवालदार विश्वनाथ शिंदे हे करीत आहेत.

धक्कादायक! तथाकथित महाराजाच्या मठावर टाकला छापा अन्...

सदरची कारवाई ही परिमंडळ ०५ चे पोलिस उपायुक्त म्रता पाटील, वानवडी विभागाचे सहा. पोलिसआयुक्त राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.सुनिल झावरे व पोलिस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी सहा. पोलिस निरीक्षक राजेश उसगांवकर, सहा.पोलिस उप-निरीक्षक दिपक मते, पोलिस अंमलदार तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी, सतिश मोरे,अमित पुजारी यांनी केली आहे.

एटीएम लुटणाऱयांना एलसीबीकडून मोठ्या शिताफीने अटक

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune city crime news bibwewadi police arrested for bike robb
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे