पुण्यातील रेकॉर्डवरील आरोपी दोन वर्षांकरीता तडीपार...
सदरचा आरोपी हा पुणे शहर, पुणे जिल्हयात किंवा बिबवेवाडी परिसरात दिसून आल्यास तात्काळ बिबवेवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर किंवा पुणे पोलिस नियंत्रण कक्ष येथे माहिती द्यावी.पुणेः बिबवेवाडी पोलिस स्टेशनकडील रेकॉर्डवरील आरोपी प्रेमसिंग शांताराम राठोड (वय ३१ वर्षे, रा. गव्हाने वस्ती गंगाधाम रोड, बिबवेवाडी पुणे) यास महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन १९५१ चे कलम ५६(१)(ब)(ब) प्रमाणे दोन वर्षाकरीता पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे परिक्षेत्र व पुणे जिल्हातून तडीपार केले आहे.
सिंहगडरोड पोलिस ठाणे अभिलेखावरील सराईत तडीपार; पाहा नावे...
बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे रेकॉर्डवरील आरोपी प्रेमसिंग शांताराम राठोड (वय ३१ वर्षे, रा. गव्हाणे वस्ती गंगाधाम रोड, बिबवेवाडी पुणे) याच्यावर बिबवेवाडी पोलिस स्टेशन येथे अंमलीपदार्थ जवळ बाळगणे व विक्री करणे अशा प्रकारचे १) बि.वाडी गुरनं. ३४/२०१७ मु.प्रोव्हि. अधि.कलम ६५ (ड) प्रमाणे. २) बि. वाडी गुरनं. ९३/१८ मु.प्रोव्हि.अधि.कलम ६५ (ड) प्रमाणे. ३) बि. वाडी गुरनं. १७३/१८ मु.प्रोव्हि.अधि.कलम ६५ (ड) प्रमाणे. ४) बि.वाडी गुरनं. १७४/१९ मु.प्रोव्हि. अधि.कलम ६५ (ड) प्रमाणे. ५) बि. वाडी गुरनं. ३३१ / १९ मु. प्रोव्हि. अधि. कलम ६५ (ड) प्रमाणे. ६) बि.वाडी गुरनं. ३१/२०२० मु. प्रोव्हि. अधि. कलम ६५ (ड) प्रमाणे. ७) बि. वाडी गुरनं. १२१/२०२० मु.प्रोव्हि.अधि. कलम ६५ ड) प्रमाणे. ८) बि. वाडी गुरनं. १२/२०२२ मु.प्रोव्हि.अधि.कलम ६५ (ड) प्रमाणे. असे एकूण ०८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर वेळोवेळी योग्यती प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याने पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.
बिबवेवाडी पोलिस स्टेशनकडील रेकॉर्डवरील आरोपी तडीपार...
हातभट्टी दारु विक्रीच्या धंदयाला त्या परिसरातील सामान्य नागरिक अक्षरश: कंटाळून गेले आहेत. तेथील मजुर वर्ग त्यांना मिळणारी मजुरी ही नशेच्या व्यसनापायी घालवून आपले कुटुंबाकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच त्याची सदर भागात दहशत असल्यामुळे तो राजरोसपणे चोरुन हातभटटीची दारु विक्री करीत आहे. म्हणुन त्याचेवर बिबवेवाडी पोलिस स्टेशन कडील सर्व्हेलन्स अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विक्रांत डिगे, सहा. पोलिस उप निरीक्षक राजकुमार बारबोले, पो.ना.३६६० दैवत शेडगे, व पो.शि. ८२८८ अनिल डोळसे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे व पोलिस निरीक्षक श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली सदर आरोपी विरुध्द पुरावे गोळा करुन महा. पो. अॅक्ट कलम ५६ (१) (ब) (ब) प्रमाणे प्रस्ताव सहा. पोलिस आयुक्त वानवडी राजेंद्र गलांडे मार्फतीने पोलिस उप-आयुक्त, नम्रता पाटील परिमंडळ - ५, यांचे कार्यालयात सादर केला. पोलिस उप-आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांनी सदर गुन्हेगारास त्यांचे कडील तडीपार आदेश क्रमांक २६/२०२२ दिनांक २१/०६/२०२२ पासून दोन वर्षा करीता पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातून तडीपार केले आहे.
विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीतून आरोपी तडीपार...
आरोपीला २२/०६/२०२२ रोजी खोपोली पोलिस ठाणे, जि. रायगड कार्यक्षेत्रात सोडण्यात आले आहे. तरी सदरचा आरोपी हा पुणे शहर, पुणे जिल्हयात किंवा बिबवेवाडी परिसरात दिसून आल्यास तात्काळ बिबवेवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर किंवा पुणे पोलिस नियंत्रण कक्ष येथे माहिती द्यावी, असे आवाहन बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी केले आहे.
येरवडा पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारस केले हद्दपार...
लोणीकंदचा सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार...
पोलिसकाकाच्या ‘मासे आणायला जायचंय...’ रजा अर्जाबाबत खरी माहिती समोर...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...