भारती विदयापीठ पोलिसांकडून ४ तासातच आरोपी जेरबंद...
आंबेगाव खुर्द, हनुमाननगर, शिवशाही चौकातील झालेल्या भांडणातील आरोपींना भारती विदयापीठ पोलिसांनी अवघ्या ४ तासातच जेरबंद केले आहे.पुणेः आंबेगाव खुर्द, हनुमाननगर, शिवशाही चौकातील झालेल्या भांडणातील आरोपींना भारती विदयापीठ पोलिसांनी अवघ्या ४ तासातच जेरबंद केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस आयुक्तांचा ट्विटर लाईव्हवरून नागरीकांशी थेट संपर्क...
रविवारी (ता. ८) सायंकाळी ८/१५ वा. चे सुमारास शिवशाही चौक हनुमाननगर, आंबेगाव खुर्द पुणे येथे एका मुलीवरुन दोन मित्र आदेश धनाजी शिळीमकर व विनोद सोमवंशी यांचे मध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे, वाद निर्माण झाला. सदरचा वाद मिटविण्या करता दोघेही मित्र त्यांचे भाऊ व इतर मित्रांना घेऊन आले होते. परंतु, वाद मिटविण्याचे ऐवजी दोघांमध्ये भांडणे होऊन विनोद सोमवंशी याचा भाऊ विशाल सोमवंशी, मित्र आकाश उनेचा, सुजित पवार, गोविंद लोखंडे, राम वाडेकर, व इतर तीन जणांनी दहशत निर्माण करुन, धनाजी शिळीमकर यास कोयत्याने हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. धनाजी शिळीमकर याचे बरोबर असणारे त्यांचे मित्रांना देखील मारहाण केली.
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन च्या शिरपेचात मानाचा तुरा...
सदर ठिकाणी असणारा टेम्पो, ज्युपीटर गाडी याचेवर देखील दगडे, कोयत्याने मारुन मोडतोड केली. सदर झालेल्या भांडणामध्ये धनाजी शिळीमकर याचे मित्र अमित थोपटे व आदेश शिळीमकर याने विनोद सोमवंशी याचे डोक्यात व पाठीवर जीवे मारण्याचे उददेशाने वार करुन त्यासही गंभीर जखमी केले. तसेच आदेश शिळीमकर याचा भाऊ अक्षय शिळीमकर, गणेश दसवडकर, स्वप्निल घारे, निखील कांबळे व इतरांनी सुध्दा सदर ठिकाणी दहशत निर्माण करुन, दगडफेक करुन विनोद सोमवंशी याचे बरोबर आलेल्या मित्रांना हाताने, कोयत्याने, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
भारती विदयापीठ पोलिसांना खूनाचा तपास करण्यात यश
सदरचा झाला प्रकार हा भारती विदयापीठ पोलिसांना समजल्यानंतर तात्काळ वरिष्ठ पोलिस निरीक्षकजगन्नाथ कळसकर यांनी तपास पथकाचे अधिकारी सपोनि गायकवाड व पोलिस उप निरीक्षक शिंदे यांचे स्टाफला आरोपी शोधून आणणे कामी आदेश दिले. अधिकारी व कर्मचारी यांनी बातमीदारा मार्फत बातमी काढून गुन्हा घडले नंतर अवघ्या ४ तासांचे आत सर्व आरोपीतांना अटक केली. सदर भांडणामध्ये गंभीर जखमी झालेला आरोपी विशाल सोमवंशी हा खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी प्यासा हॉटेलच्या मालकाला केली अटक
सदरची कामगिरी सागर पाटील, पोलिस उप आयुक्त परिमंडळ ०२, पुणे शहर, सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त, जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संगिता यादव, पोलिस निरीक्षक (गुन्हे), पोलिस निरीक्षक विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलिस उप निरीक्षक नितीन शिंदे, तपास पथकांचे अंमलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, सचिन पवार, आकाश फासगे, विक्रम सांवत, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, राहूल तांबे, सचिन गाडे, शिवदत्त गायकवाड, आशिष गायकवाड, अभिजित जाधव यांनी केली आहे.
भारती विदयापीठ पोलिसांनी फरारी आरोपीस केली अटक
नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...