पुणे शहरात पार्किंगमधील 13 दुचाकी, 2 रिक्षा आगीत भस्मसात

घटनेची माहिती समजताच उत्तमनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पुणेः शिंदे पूल (शिवणे) येथे असलेल्या शिवकमल सोसायटी बी विंग येथे इमारतीच्या खाली असलेल्या पार्किंग मधील वाहने अज्ञातांनी रात्रीच्या वेळी पेटवून दिली. ही घटना गुरुवारी (ता. 13) पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास शिवणे शिंदे पूल येथे घडली. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तेथील गाड्यांचे पेट्रोल चोरीला जाण्याच्या घटना सुद्धा घडत होत्या.

थरारक! पुणे जिल्ह्यात खूनाचा बदला खूनाने...

आग लागल्याची समजताच तातडीने अग्निशमन दलाने धाव घेत 3 बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. इमारतीच्या पार्किंगमधील १३ दुचाकी आणि २ रिक्षा आगीत जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती समजताच उत्तमनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या पार्किंग मध्ये फ्लॅटधारकांनी त्यांच्या गाड्या पार्क केल्या होत्या. गुरुवारी पहाटे पाच ते सहा वाजताच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्या गाड्या पेटवून दिल्या. यामध्ये तेरा दुचाकी आणि दोन रिक्षा जळाल्या आहे. उत्तमनगर पोलिस स्टेशन याप्रकरणी तपास करीत आहेत. सीसीटीव्ही च्या फुटेज पोलिसांना मिळाले असून, त्या अनुषंगाने पुढील तपास चालू केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Pune Vehicle Fire: शिवणेत १५ वाहने आगीत जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा नागरिकांना संशय

रांजणगाव एमआयडी पोलिस व चोरट्यांची समोरा समोर चकमक...

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune city crime news 13 bike and two rikshaw fire at shivane
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे